AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangesh Kalokhe murder Case : पप्पांचं शेवटचं तोंडही पाहू शकलो नाही.. मंगेश काळोखे यांच्या मुलींचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, केली मोठी मागणी

खोपोलीत नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या गुन्ह्याने संपूर्ण राज्य हादरलं आहे. मुलीला शाळेत सोडून येताना मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत असतानाच आता काळेखे यांच्या मुलीने मोठी मागणी केली आहे.

Mangesh Kalokhe murder Case : पप्पांचं शेवटचं तोंडही पाहू शकलो नाही.. मंगेश काळोखे यांच्या मुलींचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, केली मोठी मागणी
आमच्या पप्पांच्या मारेकऱ्यांना फआशी द्या, काळोखे यांच्या मुलांची मागणी
| Updated on: Jan 03, 2026 | 7:59 AM
Share

शेवटचं माझ्या पप्पाचं तोंडही पाहू शकलो नाही हो…… हृदय भेदून टाकणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा हा आक्रोश आहे मृत मंगेश काळोखे यांच्या मुलांचा.. आमच्या वडिलांचा काय गुन्हा होती, की त्यांना इतक्या निर्दयीपणे मारलं असा सवाल विचारत मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी आर्त स्वरात काळोखे यांच्या मुलांनी केली असून त्यांच्या आक्रोसशाने सर्वांचेच डोळे भरून आले. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खोपोलीत घडलेल्या गुन्ह्याने ते शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरलं. खोपीलीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आणि नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळेखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 26 डिसेंबर रोजी काळेखे हे त्यांच्या मुलाला शाळेत सोडण्यास गेले होते , तेथून परत येत असतानाच रसत्यालवर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून थेट हल्ला चढवला आणि वार करून काळोखे यांना संपवलं. यामुळे शहरात दहशतीचं वातावरण असून संपूर्ण राज्य हादरलं.

वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या..

त्यांच्या मृत्यूला 10 दिवस होत आले असून बाप हरपल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्यांच्या मुलांनी आज कुठे प्रतिक्रिया दिली आहे. काळोखे यांच्या दोन्ही मुलांना अश्रू अनावर झाले असून वडिलांचे शेवटचे दर्शनही नीट झाले नसल्याची व्यथा त्यांच्या आवाजात झळकत होती. ‘ आमच्या वडिलांचा काय गुन्हा होता, की त्यांना इतक्या निर्दयीपणे मारलं? ‘ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हाला आमच्या पप्पाचं शेवटचे दर्शनही झालं नाही, त्यांचं तोंडही पाहता आलं नाही असं म्हणत त्यांनी आक्रोश केला. आमच्या पप्पांना ज्यांनी मारलं त्या मारेकऱ्यांना मोक्का लावा आणि फाशी द्या, अशी मागणी शोकविव्हल मुलींनी केली. त्यांच्या आक्रोशाने सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले. दरम्यान काळोखे यांच्या हत्येमागे सुधाकर घारे यांचा हात असल्याचा दावा देखील त्यांच्या पुतण्याने केला आहे.

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस उलटच नाहीत तोच काळोखे यांची हत्या झाली. मंगेश काळोखे हे त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. तेथून ते परत येत होते, तेव्हाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ती घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. त्या फुटेजनुसार, मंगेश काळोखे यांचा हल्लेखोरांनी पाठलाग केला. काळोखे रस्त्यावर पडले, तेव्हा दोन-तीन जणांनी त्यांना घेरले. त्यानंतर 5-6 जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली. दगड, तलवारी आणि कोयत्याचा वापर करून हल्लेखोरांनी काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक परिसरात ही हत्या सुपारी देऊन केली असल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणात अनेकांची नावं समोर येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?