‘त्या’ क्षणी लावली डोळ्यावर पट्टी! लग्नानंतर कळलं, ज्याच्याशी लग्न झालं, तो ‘तो’ नव्हेच, ही तर पोट्टी

एक भाड्याचं घर घेऊन दोघं राहू लागले. तिथं महिलेला कैद करुन ठेवलं आणि कुणाशीच बोलू दिलं नाही.

'त्या' क्षणी लावली डोळ्यावर पट्टी! लग्नानंतर कळलं, ज्याच्याशी लग्न झालं, तो 'तो' नव्हेच, ही तर पोट्टी
धक्कादायक घटना..
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Jun 19, 2022 | 2:10 PM

एका महिलेच्या लग्नानंतर (Wedding dispute) विचित्र प्रकार उघडकीस आलाय. लग्नाच्या दहा महिन्यांनी या महिलेला कळलं की आपलं लग्न एका महिलेशीच लावण्यात आलंय. हे कळल्यानंतर पीडित महिला पोलिसात गेली. तिथं तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर सगळेच चकीत झाले. डेली स्टारने याबाबतचं वृत्त दिलंय. इंडोनेशियामध्ये (Indonesia) हा प्रकार घडला. गेल्या आठवड्यात एक महिलेनं कोर्टात याबाबत युक्तिवाद केला. तिनं म्हटलंय की, ज्या व्यक्तीसोबत पुरुष समजून महिलेनं लग्न केलं, तो पुरुष नसून ती तर महिलाच (Women News) आहे! आरोपी महिलेनं आपली ओळख लपवून लग्न केलं असल्याचं म्हणत फसवणुकीचा आरोप केले. लग्नाच्या दहा महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, या पीडित महिलेची ओळख उघड करण्यात आलेली नाही. तर आरोपीचं नाव इरायनी असल्याचं बोललं जातंय.

डेटिंग ऍपवर भेट…

एका डेटिंग ऍपवर इरायनी आणि पीडित महिलेची भेट झाली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉमवरील प्रोफाईलमध्ये इरायनी एका पुरुषाप्रमाणे पीडित महिलेला भासला होता. एका सर्जन सोबत त्याचा बिझनेस असल्याचंही इरायनीने पीडितेला सांगितलं होतं. नुकताच त्यानं धर्म बदलला असून तो जोडीदाराच्या शोधात आहे, असं म्हणत त्यानं पीडितेला फूस लावली होती.

साधारण तीन महिन्यांची चर्चेनंतर आणि ओळखीनंतर या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं होतं. लग्नानंतर इरायनी पीडितेच्या घरात राहू लागला. पण लग्नानंतर पीडित महिलेच्या आई-वडिलांना संशय आला. इरायनी पीडितेकडेच पैसे मागायचा. आपल्या बिझनेसबद्दल सगळं लपवायचा. त्यामुळे त्यांना शंका येणंही स्वाभाविक होतं.

शंकेतून सगळं उघड

या शंकेपासून दूर जाण्यासाठी इरायनी पीडित महिलेला घेऊन दुसरीकडे राहायला गेला. एक भाड्याचं घर घेऊन दोघं राहू लागले. तिथं महिलेला कैद करुन ठेवलं आणि कुणाशीच बोलू दिलं नाही. पीडितेवर बंधनं घातली. आता मुलीशी बोलणं होत नाही म्हणून आईवडील अस्वस्थ झाले. त्यांनी पोलिसांनी याबाबत सांगितलं. पोलिसांनी इरायनीला शोधून काढलं आणि जेव्हा चौकशी केली, तेव्हा भलतीच गोष्ट समोर आली. ही गोष्ट कळल्यानंतर सगळ्यांच धक्का बसला.

इरायनी हीला पुरुष समजलं जात होतं, ती एक महिला असल्याचं तपासातून समोर आलं. धोका देऊन इरायनीने एका महिलेसोबतच लग्न केलं होतं. लग्नानंतरच्या दहा महिन्याच्या काळात लाखो रुपयांचा गंडाही घातला होता. यानंतर इरायनीविरोधात कोर्टात केस दाखल करण्यात आली त्यानंतर सगळं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक

पीडितेने इरायनीवर सनसनाटी आरोपही लावले होते. लग्नानंतर इरायनीने एकदाही महिलेला स्पर्श केला नव्हता. तो नेहमी काही ना काही कारण काढून लांब व्हायचा. रोमान्स करुन झाल्यावर नेहमी लाईन बंद करुन टाकायचा आणि शरीर संबंध ठेवताना पीडितेच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जात होती. त्यामुळे अनेक महिने याप्रकाराचा भांडाफोड होऊ शकला नव्हता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें