मोठी बातमी ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर दोन जणांची पाळत, सातारा पोलिसांना तपासाचे आदेश

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Minister of State for Home Shambhuraj Desai is being monitored by two people).

मोठी बातमी ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर दोन जणांची पाळत, सातारा पोलिसांना तपासाचे आदेश
शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री


सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देसाई इव्हेंनिंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर दोन व्यक्ती पाळत ठेवत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे याबाबत सातारा पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. शंभूराज जेव्हा वॉकसाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकही होते. पण त्यांना रस्त्यावर दुचाकीवर असलेल्या दोघांच्या हलाचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी तातडीने याबाबत आपल्या सुरक्षा रक्षकांना तपासाचे आदेश दिले (Minister of State for Home Shambhuraj Desai is being monitored by two people).

शंभूराज यांची प्रतिक्रिया

शंभूराज देसाई यांनी या विषयावर ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. “मी मगाशी जरा बाहेर गेलो होतो. माझे गार्ड माझ्यासोबत होते. पण मोटरसायकलवर दोन लोकांनी दोन ते तीन वेळा मागेपुढे येऊन मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर मी घराजवळ आलो तर तिथेही ते रेकॉर्डिंग करताना दिसले. त्यामुळे मी लगेच सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती घ्या, असं सांगितलं. मला काही गंभीर वाटत नाही. तरीपण ते कोण होते ते कळत नाही. मला दोन माणसं संशयित वाटत होते” असं शंभूराज यांनी सांगितलं (Minister of State for Home Shambhuraj Desai is being monitored by two people).

‘…म्हणून मला संशय आला’

“माझ्या घराजवळ सीसीटीव्ही नाही. बंगल्यातील गार्डला याबाबत माहिती नाही. पण गेटच्या बाहेर मोठा परिसर आहे. आमच्या शिपायानेही तसं काही दिसत नाही, असं सांगितलं. पण वॉक करताना दोन माणसं संशयित वाटले. ते दोन-तीन वेळा मोटारसायकलेन पुढे गेले आणि परत मागे आले. मी याविषयी एसपींशी बोलतो. पण काळजी करण्यासारखं काही नाही. सहज मोटारसायकलने जाणारी माणसं वेगळी असतात. त्यामुळे मला संशय आला”, अशी प्रतिक्रिया शंभूराज यांनी दिली.

शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले ते या व्हिडीओत बघा:

हेही वाचा : चैनीसाठी आलिशान गाडीतून बोकड चोरीचा हायटेक फार्म्युला, सांगली पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI