भांडण वडिलांकडे घेऊन गेल्याचा राग, शेवटी मित्राची तलावात बुडवून हत्या, 13 वर्षीय मुलाच्या कृत्याने खळबळ

एका अल्पवयीन मुलाने आपल्यापेक्षा लहान मित्राची तलावात बुडवून हत्या केलीय. वडिलांकडे तक्रार केल्यामुळे या मुलाने आपल्याच मित्राला मारण्याचे टोकाचे पाऊल उचलले. सध्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

भांडण वडिलांकडे घेऊन गेल्याचा राग, शेवटी मित्राची तलावात बुडवून हत्या, 13 वर्षीय मुलाच्या कृत्याने खळबळ
crime
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 10:37 PM

चेन्नई : तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्यापेक्षा लहान मित्राची तलावात बुडवून हत्या केलीय. वडिलांकडे तक्रार केल्यामुळे या मुलाने आपल्याच मित्राला मारण्याचे टोकाचे पाऊल उचलले. सध्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार विरुधुनगर येथे एक तेरा वर्षाचा मुलगा आपल्या 9 वर्षाच्या मुलासोबत खेळत होता. मात्र क्षुल्लक कारणावरुन या दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर नऊ वर्षीय मुलाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलाची शिकायत त्याच्या वडिलांकडे केली. परिणामी त्याच्या वडिलांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. वडील रागावल्यामुळे 13 वर्षीय मुलाच्या मनात 9 वर्षीय मुलाविषयी चांगलाच राग निर्माण झाला. परिणामी त्याने लाडीगोडी लावून 9 वर्षीय मुलाला तलावाच्या पाण्यात बुडवून त्याचा खून केला.

खुनाचा उलगडा नेमका कसा झाला ?

आपल्या मित्राचा पाण्यात बुडवून खून केल्यानंतर 13 वर्षांचा अल्पवयीन मुलगा घरी परत आला. मात्र 9 वर्षाचा मुलगा न परतल्यामुळे त्याच्या घरच्यांना चिंता लागली. बराच शोध घेऊनही मुलगा न सापडल्यामुळे 9 वर्षीय मुलाच्या घरचे घाबरले. त्यांनी मुलगा हरवल्याची पोलिसांत तक्रार दिली. पोलिसात प्रकारण गेल्यानंतर लहान मुलाची सोधाशोध सुरु झाली. मात्र अचानकपणे या मुलाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले.

मुलाला बालसुधारगृहात पाठवलं

दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये 13 आणि 9 वर्षाचे हे दोन्ही मुलं सोबत खेळताना तसेच भटकताना दिसले. त्यांतर 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला सविस्तरपणे विचारल्यानंतर 9 वर्षीय मुलाला मारल्याचे त्याने कबूल केले. ही घटना घडल्यामुळे येथे एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन 13 वर्षीय मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय.

इतर बातम्या :

Aurangabad: फाइव्ह स्टार हॉटेलच्या शाही विवाह सोहळ्यातून 12 तोळ्यांचे दागिने, दोन लाखांची रोकड लंपास!

अबब! भोज थाळी पडली चक्क 90 हजार रुपयांना! फेसबुकवरच्या जाहिरातीला भूलला अन् जाळ्यात अडकला

व्यसनी व्यक्ती, 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण अन् आकाश-पाताळ एक करणारे पोलीस; एका सुटकेची चित्तरकथा…