AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब! भोज थाळी पडली चक्क 90 हजार रुपयांना! फेसबुकवरच्या जाहिरातीला भूलला अन् जाळ्यात अडकला

फेसबुकवरील बनावट जाहिरात पाहून ऑनलाइन बुकिंग करणे औरंगाबादमधील व्यक्तीला चांगलेच महागात पडले. 'बाय वन गेट टू फ्री' अशी भोज थाळीची जाहिरात पाहून सायबर चोरांच्या जाळ्यात अडकून 90 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

अबब! भोज थाळी पडली चक्क 90 हजार रुपयांना! फेसबुकवरच्या जाहिरातीला भूलला अन् जाळ्यात अडकला
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 2:47 PM
Share

औरंगाबादः फेसबुकवरील (Facebook) शाही भोज थाळीच्या जाहिरातीला भूलल्यामुळे एका व्यक्तीला तब्बल 90 हजारांचा गंडा घातल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. सोमवारी एमआयडीसी सिडको (CIDCO MIDC) पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात फेसबुकवरील जाहिरात पाहून बाय ‘वन गेट टू फ्री’ चे अमिष पाहून संबंधित व्यक्तीला फसवण्यात (Cyber Fraud) आले होते. मात्र आम्ही फेसबुकवर कोणत्याही प्रकारची जाहिरात करत नाहीत, असे औरंगाबादमधील भोज रेस्टॉरंटच्या मालकांनी स्पष्ट केले आहे.

फेसबुकवर पाहिली ‘बाय वन गेट टू फ्री’ ची जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पंढरीनाथ ठोंबरे, हे नारेगाव येथील रहिवासी याप्रकरणी फिर्यादी आहेत. ते स्क्रॅपचा व्यवसाय करतात. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिकलठाणा एमआयडीसीतील शाखेत खाते आहे. ते दोन वर्षांपासून क्रेडिट कार्ड वापरतात. 24 सप्टेंबरर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घरी फेसबुक पहात असताना ‘शाही भोज थाली’ची जाहिरात दिसली. बुकिंगसाठी मोबाइल क्रमांकही दिलेला होता. त्यावर फोन केला असता त्यांनी ऑनलाइन बुकिंगकरिता क्रेडिट कार्डची सर्व माहिती मागितली. ठोंबरे यांनी ती दिली. मोबाइलवर आलेला ओटीपीदेखील सांगितला. त्यानंतर क्रेडिट कार्डमधून 49 हजार 490 रुपये असे दोन वेळा कपात झाले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. दोन महिन्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

गुगल, फेसबुकवरील जाहिरातींना बळी पडू नका!

गुगल किंवा फेसबुकवर आलेल्या जाहिरातीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहान पोलिसांनी केले आहे. ज्या शॉपची जाहिरात आहे, त्या ठिकाणचा अधिकृत मोबाइल क्रमांक असेल तर जाहिरातीची आधी खात्री करावी आणि नंतरच आर्थिक व्यवहार करावा, कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

इतर बातम्या-

Pune Crime | किरकोळ वादातून मित्राचा खून, रक्तरंजित चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात

40 लाख विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी इन्फोसिसचा हातभार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...