AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 लाख विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी इन्फोसिसचा हातभार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (Higher and Technical Education) इन्फोसिस (Infosys) सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

40 लाख विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी इन्फोसिसचा हातभार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सामंजस्य करार
इन्फोसिस सोबत सामंजस्य करार
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 1:44 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (Higher and Technical Education) इन्फोसिस (Infosys) सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे. इन्फोसिस सोबत सामंजस्य करार केल्यानं राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 40 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना इन्फोसिसच्या मदतीनं कौशल्य आधारित अभ्यासक्रमांचं (Skill Based Courses) शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत यांचं ट्विट

कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षण मिळणार

महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणू महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.

या कराराचे नेमके फायदे काय?

या करारामुळं 40 लाख विद्यार्थ्यांना आणि 1 लाख प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. कौशल्य आधारित आणि तांत्रिक शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत देण्यात येणार असल्यानं राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही. इन्फोसिस या कंपनीने विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले आहेत. या कोर्सेसचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

मोफत अभ्यासक्रम

इन्फोसिसनं तयार केलेले अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निःशुल्क आणि औपचारिक (formal) अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत.

प्रायोगिक तत्वावर दोन संस्थामध्ये उपक्रम सुरु

पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

संगणक आधारित अभ्यासक्रम

संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेसचं शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

40 लाख विद्यार्थ्यांना फायदा

तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालया अंतर्गत 3 हजार महाविद्यालयातील 30 लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण 40 लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे.

इतर बातम्या:

विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचंय, 2022-23 पासून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र

Maharashtra School Reopen Guidelines : राज्यात शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग सुरु होणार, संपूर्ण नियमावली एका क्लिकवर

Uday Samant said Maharashtra Higher and Technical Education Department sign mou with Infosys 40 students will be get benefit

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.