विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचंय, 2022-23 पासून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी असं प्रस्तावित करण्यात आलं आहे.

विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचंय, 2022-23 पासून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र
महाविद्यालयीन विद्यार्थी

नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (New Education Policy) विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर (UG and PG Admission) अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घ्यावी असं प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) केंद्रीय विद्यापीठांना पत्र लिहिलं आहे. 2022-23 पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य विद्यापीठ आणि खासगी विद्यापीठांची इच्छा असल्यास त्यांनी संगणक आधारित प्रवेश परीक्षा घ्यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.प्रवेश परीक्षांचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 13 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पहिल्या टप्प्यात 45 केंद्रीय विद्यापीठांना 2022-23 पासून प्रवेश परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रवेश परीक्षेसंदर्भात अतिरिक्त माहिती डिसेंबरमध्ये जाहीर केली जाणार आहे.यूजीसीनं केंद्रीय विद्यापीठांना यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे.

एनटीए परीक्षा घेणार

यूजीसीनं केंद्रीय विद्यापीठांना लिहिलेल्या पत्रानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षांचं आयोजन या वर्षीपासून करण्यात येत होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे 2022-23 पासून प्रवेश परीक्षांचं आयोजन करण्यात येणार आहे.

प्रवेश परीक्षा तीन तासांची असणार

विद्यापीठातील प्रवेश परीक्षा ही तीन तासांची असण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्यापीठ जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठातील प्रवेश परीक्षेप्रमाण तीन तासांची प्रवेश परीक्षा असेल. यामध्ये दोन विभाग असतील त्यातील पहिल्याविभागात सामान्य क्षमता चाचणी साठी 50 प्रश्न आणि अभ्यासक्रमासाठी 30 गुण निश्चित करण्यात आल्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Maharashtra School Reopen Guidelines : राज्यात शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग सुरु होणार, संपूर्ण नियमावली एका क्लिकवर

CBSE Class 10 Answer Key 2021 : सीबीएसई दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची उत्तरतालिका कुठं पाहणार? डाऊनलोड कशी करणार?

UGC wrote letter to Universities to conduct entrance test for UG and PG courses from 2022-23

Published On - 12:30 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI