मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

मुंबईतील चेंबूर वाशी नाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना (Chembur rape case) घडली आहे.

  • आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 22:52 PM, 1 Feb 2020
मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

मुंबई : मुंबईतील चेंबूर वाशी नाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना (Chembur rape case) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. भगिरथ उर्फ रॉक जेठे आणि सनी पाटील अशी या दोन आरोपींची नावं आहे. हे दोन्ही आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचे आहेत.

चेंबूर वाशीनाका परिसरात आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सह्याद्री नगर, वाशीनाका या ठिकाणी पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहते. 30 जानेवारीला रात्री 10 च्या सुमारास ही मुलगी घराबाहेर होती. त्यावेळी याच परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या आरोपींनी तिला फूस लावली. तसेच तिला पूर्व मुक्त मार्गाजवळील निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात पीडित मुलीला घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने भगिरथ उर्फ रॉक किसन जेठे (25) आणि सनी रमेश पाटील (24) यांना अटक केली. यातील भगीरथ उर्फ रॉक याच्यावर आरसीएफ पोलीस ठाण्यात यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. याबाबत अजून तपास सुरु असल्याची माहिती या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत देसाई यांनी दिली (Chembur rape case) आहे.