Mira Road Murder : सरस्वतीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मनोज साने याची संपत्ती किती?, भाड्यातूनच कमावतो हजारो रुपये; आकडा थक्क करणारा
7 जून रोजी मीरा भाईंदर येथील गीता आकाशदीप सोसायटीत अत्यंत क्रूर हत्या झाली. मनोज साने या व्यक्तीने त्याच्या लिव्ह इनमधील पार्टनरची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे कित्येक तुकडे केले.

मुंबई : मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Mira road Murder) राहणाऱ्या मनोज साने याने त्याच्या पार्टनरची क्रूरपणे हत्या केली. तिच्या देहाचे त्याने शंभरच्या जवळपास तुकडे केल्याचं सांगितलं जातं. हे सर्वच तुकडे पोलिसांना सापडलेले नाहीत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणात पोलिसांना रोज नवनवी (murder case updates) माहिती मिळत आहे. त्यानुसार पोलिसांचा तपासही सुरू आहे. नव्या माहितीनुसार मनोज सानेकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मनोज सानेकडे एक टू बीएचकेचा फ्लॅट आहे. त्याची किंमतच कोरोडो रुपये आहे. हा फ्लॅट त्याने भाड्याने दिला होता. त्यातून त्याला महिन्याला 40 हजार रुपये भाडे मिळायचे. त्याचं स्वत:चं रेशन दुकान होतं. त्यातून त्याला चांगली मिळकतही होत होती. बोरिवली सारख्या ठिकाणी त्याचं दुकान आहे. तो आयटीआय झालेला आहे. गणितात प्रचंड हुशारही आहे. मात्र, त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं. तो संपूर्ण दिवस नशेतच असायचा. त्यामुळेच त्याचं दुकानाकडे कमी लक्ष झालं होतं. त्यामुळे त्याला दुकानातून कमी कमाई होत होती. परिणामी त्याने ते दुकानही बंद केलं होतं.
दुर्गंधी घालवण्यासाठी परफ्यूम आणले
मनोजने सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून त्याने घरात स्प्रे आणि परफ्यूम आणून ठेवले होते. तो घरात परफ्यूम मारायचा. त्यामुळे दुर्गंधी येत नव्हती. मात्र, 5 जून रोजी त्याच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्याचा फ्लॅट खोलण्याचा शेजाऱ्यांनी प्रयत्न केला. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मनोज दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे शेजाऱ्यांनी थेट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही प्रचंड दुर्गंधी आल्याने पोलिसांनी दरवाजा उघडला. आत गेल्यावर मनोज परफ्यूम स्प्रे करताना दिसला, अशी माहिती मनोजच्या शेजारी राहत असलेल्या एका महिलेने दिली.
ते कुणाशीही बोलत नव्हते
मनोज आणि सरस्वती तीन वर्षापासून गीता आकाशदीप सोसायटीत राहत होते. या सोसायटीत ते भाड्याने राहत होते. मात्र, ते कुणाशीच बोलायचे नाहीत. त्यांच्या घरात एसी, कुलर आणि फ्रिजही नव्हता. दोघेही दिवाळी आणि होळी सारख्या सणातही भाग घ्यायचे नाहीत. कोणत्याही सणाच्या दिवशी ते दरवाजा उघडत नसायचे. सण उत्सवात त्यांनी घराच्या बाहेर कधी दिवाही लावला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कधीच कोणता प्रश्न विचारला नाही, असं शेजारी आणि सोसायटीतील लोक सांगत आहेत.
