AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: महिलांना अश्लिल व्हीडिओ पाठवणाऱ्या विकृत तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप

हा तरुण एका आधार कार्ड केंद्रावर काम करत होता. | MNS

VIDEO: महिलांना अश्लिल व्हीडिओ पाठवणाऱ्या विकृत तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप
हा तरुण महिलांना अश्लिल मेसेज आणि व्हीडिओ पाठवत असे.
| Updated on: Apr 19, 2021 | 10:24 AM
Share

भाईंदर: महिलांना अश्लील एसएमएस आणि व्हिडियो पाठवणाऱ्या एका विकृत तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (MNS leader beat youth who send obscene video and message on mobile phone)

प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण एका आधार कार्ड केंद्रावर काम करत होता. त्याठिकाणी या तरुणाला अनेक महिलांचे मोबाईल नंबर मिळाले. या मोबाईल क्रमांकांवर हा तरुण अश्लिल मेसेज आणि व्हीडिओ पाठवत असे. या सगळ्याला कंटाळून एका महिलेने मनसेच्या कार्यकर्ता कविता वायंकर यांच्याकडे तक्रार केली.

VIDEO | पुण्यात मनसे नगरसेवकाने करुन दाखवलं, हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल

त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला हुडकून त्याला काशीमिरा येथील शाखेत आणले. याठिकाणी संबंधित तरुणा यथेच्छ चोप देण्यात आला. या तरुणाविरोधात मनसेकडून तक्रारही दाखल केली जाणार होती. मात्र, तरुणाने खूप गयावया केल्यानंतर त्याला गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, नवी मुंबईत कुटुंबावर कोयता हल्ला

नवी मुंबईत दोन कुटुंबांमध्ये सुरु असलेल्या वादाचे रुपांतर खुनी हल्ल्यात झाले. कोपरी गावात तिघा जणांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे. छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. त्यातूनच हा कोयता हल्ला करण्यात आला.

छेड काढल्याचा आरोप करत काजल नावाच्या तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या:

ज्या लेकीचं ट्रकवर नाव तिच्याच अंगावरुन ट्रक चालवला, दोन्ही मुलींना संपवणाऱ्या बापाचीही आत्महत्या, महाराष्ट्र हादरला

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

मामाच्या मुलीशी संबंध न तोडल्याचा राग, 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या

(MNS leader beat youth who send obscene video and message on mobile phone)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.