मामाच्या मुलीशी संबंध न तोडल्याचा राग, 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या

आरोपीचे मामाच्या मुलीसोबत लग्न ठरले होते, मात्र मयत तरुणाचेही तिच्याशी प्रेमसंबंध असल्याने त्याची हत्या करण्यात आली ( Sangli youth murdered love affair )

मामाच्या मुलीशी संबंध न तोडल्याचा राग, 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
सांगलीत प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या
अनिश बेंद्रे

|

Apr 17, 2021 | 7:32 AM

सांगली : मामाच्या मुलीशी असणारे संबंध तोडले नाहीत, म्हणून 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडची गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. (Sangli 19 years old youth allegedly murdered over love affair with uncle’s daughter)

जत तालुक्यातील दरीबडची गावात गुरुवारी रात्री साडे आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हत्येमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जत पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच रातोरात दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. धनाजी भागप्पा टेंगले असं 19 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.

आरोपीचे मामाच्या मुलीसोबत लग्न ठरलेले

धनाची टेंगले याचे आरोपी राजू लेंगरे याच्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब राजूला माहिती होती. परंतु राजूचे संबंधित तरुणीसोबत लग्न करण्याची चर्चा घरातील नातेवाईकांमध्ये सुरू होती. यातूनच राजू आणि धनाजी यांच्यात धुसफूस सुरु झाली. राजू लेंगरेने धनाजीला आपल्या मामाच्या मुलीचा नाद सोड, म्हणून तगादा लावला होता, तरीही दोघांमधील प्रेमसंबंध कायम असल्याचा संशय आरोपी राजूला होता.

रस्त्यातच दगडाने ठेचून हत्या

धनाजी टेंगळे गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध वितरित करण्यासाठी दरीबडची गावात आला होता. दूध वाटून तो दररोज आठपर्यंत घरी येत असे. परंतु रात्री दहा-साडेदहा वाजले तरी तो घरी परतला नाही, म्हणून घरातील वडील आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना दरीबडची कुलाळवाडी रस्त्यावर धनाजीचा मृतदेह आढळून आला.

धनाजीच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने गंभीर वार करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी दुधाची किटली आणि चप्पलही तिथेच पडले होते. धनाजीवर पाळत ठेवून पद्धतशीरपणे खून करण्यात आला. जत पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या –

ST कंडक्टर तरुणीच्या अंगावर चटके, खून करुन माळरानावर फेकलं, डेपो हादरला

कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी

(Sangli 19 years old youth allegedly murdered over love affair with uncle’s daughter)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें