AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेची 352 कोटी रुपयांमध्ये फसवणूक, या बड्या ग्रुपवर ईडीकडून आरोपपत्र

ed chargesheet: जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद म्हणजेच आर. एल. ग्रुप विरोधातील हे प्रकरण आहे. या बड्या ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज प्रकरणातून तब्बल 352 कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सर्वात आधी सीबीआयने तपासले होते.

बँकेची 352 कोटी रुपयांमध्ये फसवणूक, या बड्या ग्रुपवर ईडीकडून आरोपपत्र
ed
| Updated on: Jul 30, 2024 | 2:05 PM
Share

कर्जासाठी खोटी कागदपत्रे देऊन भारतीय स्टेट बँकेची फसवणूक प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. नागपूरमधील विशेष पीएमएलए न्यायालयात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जळगावमधील प्रसिद्ध आर. एल. म्हणजे राजमल लखीचंद ग्रुपवर ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात यापूर्वी केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) तीन गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यात मनी लॅण्डरिंगचा प्रकार समोर आल्यावर ईडीकडे हे प्रकरण दिले.

सीबीआयकडून तीन एफआयआर

जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद म्हणजेच आर. एल. ग्रुप विरोधातील हे प्रकरण आहे. या बड्या ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज प्रकरणातून तब्बल 352 कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सर्वात आधी सीबीआयने तपासले होते. त्या संदर्भात सीबीआयने तीन वेगवेगळे एफआयआर दाखल केले होते. त्यानंतर याप्रकरणात मनी लॉन्ड्रीग झाल्याच्या संशय आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला आहे.

तेरा ठिकाणी छापे, 24 कोटी रुपयांचे सोने जप्त

ईडीने याप्रकरणी 17 ऑगस्ट 2023 रोजी जळगावसह नाशिक, ठाणे अशा महाराष्ट्रातील तेरा ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी तब्बल 24 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले होते. तसेच 1 कोटी 21 लाख रुपयांची रोख रक्कम ही जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास अनेक महिने सुरु होता. हा तपास पूर्ण केल्यानंतर ईडीने नागपुरातील विशेष पीएमएलए कोर्टासमोर प्रॉसिक्युशन कंप्लेंट (चार्जशीट) दाखल केली आहे.

काय आहे आरोपपत्रात

आर एल ग्रुपने भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यासाठी खोटे सोने खरेदी विक्रीचे व्यवहार दाखवल्याचे आरोप ठेवला आहे. तसेच स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची रक्कम दुसऱ्या व्यवसायात वळवण्यात आली आहे. तसेच बँकेकडे गहाण असणारी संपत्ती परस्पर विकून बँकेची 352 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेत फसवणूक करण्यात आली, असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.