AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नसमारंभात ठेवलेल्या अन्नातून विषबाधा, ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले…

सगळ्यांनी एक शंका उपस्थित केली आहे, जेवणात दुधाचा एक पदार्थ ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. रात्री उशिरा सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.

लग्नसमारंभात ठेवलेल्या अन्नातून विषबाधा, ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
hospital Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 26, 2023 | 4:33 PM
Share

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन (Khargone News) जिल्ह्यात शनिवारी रात्री एक लग्न झालं. तिथं करण्यात आलेल्या जेवणातून अनेकांना विषबाधा झाल्याचं उघकीस आलं आहे. विशेष म्हणजे लग्नात आलेल्या ४० पेक्षा अधिक लोकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. रात्री उशिरा उल्टी आणि पोटात दुखू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयात (hopital) लोकांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामध्ये महिला, पुरुष आणि मुलं सुध्दा आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार खरगोनच्या न्यू हाउसिंग बोर्ड कॉलनी येथील आहे. शनिवारी रात्री लग्नात अनेक लोकं सामील झाले होते. रात्री जेवण झाल्यानंतर अनेक पैपाहुण्यांना त्रास सुरु झाला. एका पाठोपाठ एकाला त्रास सुरु झाला. नंतर डॉक्टरांकडे दाखल झाल्यानंतर जेवणातून विषबाधा झाल्याचं उघडकीस आलं आहे.

सगळ्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

सगळ्यांनी एक शंका उपस्थित केली आहे, जेवणात दुधाचा एक पदार्थ ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. रात्री उशिरा सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. सध्या रुग्णालयात दाखल केलेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.

पैपाहुणे त्यामुळे अधिक घाबरले

दोन ते तीन गावातील लोकांना हा त्रास झाला आहे. सगळ्यांना त्रास व्हायला सुरुवात झाल्याने लोकांची मोठी पळापळ सुरु झाली होती. लग्नात आलेले सगळे पैपाहुणे त्यामुळे अधिक घाबरले. ज्या तरुणांचा त्रास कमी झाला आहे. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. काही रुग्णांच्यावरती अजून उपचार सुरु आहेत. लोकांना नेमकी कशामुळं विषबाधा झाली आहे. याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोषी व्यक्तीवर कारवाई कऱण्यात येणार आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप