फक्त छोट्याशा रुमालाने दिसेल त्याला ढगात पोहोचवायचा, 900 मर्डर करून घाम फोडला; कोण आहे हा सीरिअल किलर?
ना बंदूक, चाकू, ना कोणतंही हत्यार... फक्त रुमालाने जागेवरच ठार करायचा, 900 लोकांची हत्या करणारा महाखतरनाक सीरिअल किलर माहीत आहे का?

Dangerous Serial Killer: कोयत्याने हत्या केली… चाकूने वार केले… गोळीबार केला… अशा अनेक धक्कायदायक घटना आपण ऐकत असतो, वाचत असतो. पण साध्या दिसणाऱ्या रुमालाने 900 पेक्षा अधिक लोकांचे प्राण घेणाऱ्या सिरियल किलरबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आपण रुपाल साध्या कामासाठी वापरतो, पण या महाखतरनाक व्यक्तीने रुमालाचा उपयोग लोकांना जीवेमारण्यासाठी केला. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, हा सिरियल किलर कोण आहे, आणि आता काय करतो. सांगायचं झालं तर, भारताचा इतिहास फक्त सम्राट आणि संतांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. भारतात असे अनेक कुख्यात गुंड होऊन गेले, ज्यांचं नाव ऐकलं तरी भीती वाटते.
18 आणि 19 व्या शतकादरम्यान, असंच एक नाव उदयास आलं ज्याने मृत्यूला आपला व्यवसाय बनवलं होतं. अनेकांचे प्राण त्याने घेतले. या महाभयंकर सिरियल किलरचं नाव होतं बेहराम… याचं नाव ऐकताच ब्रिटीश अधिकारी देखील थरथर कापत होते.
रुमालच खून करण्याचं हत्यार बनलं
बेहराम याची ओळख त्याच्या खास अंदाजात करुन दिली जात होती. बेहराम बंदूक किंवा चाकूचा उपयोग करुन नाही तर, साधारन दिसणाऱ्या रुमालाचा वापर करुन माणसांची शिकार करायचा. असं देखील सांगितलं जातं की, त्याने रुमालाच्या मदतीने तब्बल 931 लोकांची गळा दाबून हत्या केली. बेहरामची ही पद्धत इतक्या स्वच्छतेने केली जात होती की मृतदेहही सापडत नव्हते.
हत्या करताना बेहराम कधीच एकटा नसायचा… त्याच्यासोबत त्याची 200 लोकांची टोळी असायची. बेहराम आणि त्याचे साथीदार उद्योजक, यात्रेकरू आणि पर्यटक यांच्यासोबत एकत्र प्रवास करायचे आणि वेळ साधत सर्व निष्पाप लोकांवर हल्ला करायचे. त्यांना मारुन टाकायचे आणि पैसे आणि दागिन्यांची लूट करायचे.
त्या काळात दिल्लीहून ग्वाल्हेर आणि जबलपूरला जाणारे व्यापारी आणि प्रवासी या मार्गांवरून जाणं टाळत होतं. अशात कॅप्टन विल्यम स्लीमन नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने जर याची चौकशी केली नसती तर हे गूढ कायम राहिलं असतं. 1809 मध्ये, कॅप्टन स्लीमन यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली. वर्षानुवर्षे तपास केल्यानंतर त्यांना कळलं की हे सर्व ठग बेहराम आणि त्याच्या टोळीचे काम होतं.
अधिकाऱ्यांनी बेहराम याच्या टोळीतील अनेकांना कैद केलं आणि त्यानंतर बेहराम याला देखील ताब्यात घेण्यात आलं. तेव्हा बेहराम याचं वय 75 वर्ष होतं. अनेक हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली बेहराम याला फाशी देण्यात आली. जगातील सर्वात धोकादायक सिरीयल किलर म्हणून त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे.
