बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या

बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या

बॉयफ्रेण्ड सतत या मुलीचा बाप कोण आहे? असे विचारत असल्याने वांद्र्यातील एका अल्पवयीन आईने पोटच्या लहान मुलीची हत्या (Mother kill new born baby mumbai) केली.

सचिन पाटील

| Edited By:

Dec 22, 2019 | 10:06 PM

मुंबई : बॉयफ्रेण्ड सतत या मुलीचा बाप कोण आहे? असे विचारत असल्याने वांद्र्यातील एका अल्पवयीन आईने पोटच्या लहान मुलीची हत्या (Mother kill new born baby mumbai) केली. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी वांद्र्यात घडली होती. मात्र दोन महिन्यांनी या घटनेतील आरोपी आईला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तिचा बॉयफ्रेण्ड सतत तिला विचारायचा या मुलीचा बाप कोण आहे ? त्यावर दोघांचे भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात तिने आपल्याच मुलीची हत्या करुन मृतदेह रिक्षाच्या मागच्या सीटवर ठेऊन पळून गेली होती.  असे कारण अल्पवयीन आईने दिले (Mother kill new born baby mumbai) आहे.

या घटनेनंतर आरोपी आईचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली तेव्हा तिचा शोध लागला. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी समोर आली होती. वांद्रे पश्चिमच्या कुरेशी नगरमध्ये एका रिक्षाच्या मागच्या सीटवर जवळपास एका महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडला होता.

या घटनेत आरोपी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी भाभा, व्ही एन देसाई, कूपर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि इतर अनेक प्रायव्हेट रुग्णालयात जन्म घेतलेल्या जवळपास 3000 मुली-मुलांची चौकशी केली. मात्र काहीच सापडले नाही. त्यानंतर घरी जन्म घेतलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला. तसेच झोपड्या, मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वाराजवळ असलेल्या भिकाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. जवळपास 8000 नवजात शिशू आणि त्यांच्या पालकांची तपासणी केल्यानंतर ही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही .

या सर्व शोधानंतर ताडदेवमध्ये एका मस्जिदच्यासमोर बसलेल्या एका भिकाऱ्याने पोलिसांना सांगितला की, इथे एक मुलगी आपल्या मुलीसोबत पूर्वी यायची पण ऑक्टोबर महिन्यापासून तिच्यासोबत मुलगी दिसत (Mother kill new born baby mumbai) नाही. पोलिसांनी त्या मुलीला जेव्हा ताब्यात घेऊन तपास सुरु केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला.

तपासात पोलिसांना जी माहिती समोर आली आहे ते कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मुलीचा बॉयफ्रेण्ड सतत मुलीचा बाप कोण? सध्या तिची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें