‘आज रात्री नवरा शेतावर जाणार, तेव्हा तू…’, पण … काय घडलं?
कुठेही आणि कोणावरही प्रेम होऊ शकतं. मग, भले तुमच लग्न झालेलं असेल किंवा नसेल. तुम्ही प्रेमाला कितीही लपवलत, तरी प्रेम कधीही लपत नाही. काहीवेळा या प्रेमात अशा काही गोष्टी घडतात की, ज्याचा तुम्ही विचारही केलेला नसतो.

प्रेम ही गोष्ट कोणाच्या हातात नसते. कधीही, कुठेही आणि कोणावरही प्रेम होऊ शकतं. मग, भले तुमच लग्न झालेलं असेल किंवा नसेल. असं म्हणतात तुम्ही प्रेमाला कितीही लपवलत, तरी प्रेम कधीही लपत नाही. काहीवेळा या प्रेमाचा धक्कादायक शेवट होतो. असच एक प्रकरण बिहारच्या पूर्णियामध्ये समोर आलय. इथे एका मुस्लिम युवकाला दोन मुलांच्या आईच्या प्रेमात पडणं खूपच महाग पडलं. रात्री उशिरा विवाहित गर्लफ्रेंडने त्याला भेटायला बोलावलं. तो ही खुश होऊन गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या घरी गेला. दोघांचा बंद खोलीत रोमान्स सुरु होता.
त्याचवेळी तिथे महिलेचा नवरा आला. दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहून त्याचा संयम सुटला. त्याचवेळी गावातले आणखी काही लोक तिथे आले. सगळ्यांनी मिळून त्या मुस्लिम बॉयफ्रेंडची चांगलीच धुलाई केली. दोनवेळा पोलीस त्या युवकाला सोडवायला आले. पण गावकऱ्यांनी त्यांच्याशी सुद्धा वाद घातला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बोलवावे लागले. त्यांनी मोठ्या मुश्किलीने गाववाल्यांच्या तावडीतून युवकाची सुटका केली.
दोघांची बाजारात भेट
नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील बक्सा घाट रोडच प्रकरण आहे. सोनी देवीच (35) चुनापूरच्या मोहम्मद कुर्बान (32) सोबत अफेअर सुरु होतं. सोनी विवाहित आहे. तिचं लग्न 18 वर्षांपूर्वी राजेश ऋषी सोबत झालं होतं. महिलेला दोन मुली आहेत. एका मुलीच यावर्षी लग्न होणार आहे. सगळं भरलेले कुटुंब असतानाही सोनी देवी नवऱ्याला धोका देत होती. तीन वर्षांपासून तिच मुस्लिम युवक कुर्बानसोबत अफेअर सुरु होतं. दोघांची बाजारात भेट झाली. लपून-छपून दोघे भेटू लागले. पण गुरुवारची रात्र दोघांना भारी पडली.
दोघांचा बंद खोलीत प्रणय रंगलेला
पोलिसांनुसार, महिलेने तिच्या बॉयफ्रेंडला फोन करुन सांगितलेलं की, आज रात्री नवरा शेतात मचाणावर झोपणार आहे. प्लानुसार प्रियकर मध्यरात्री तिच्या घरी गेला. दोघांचा बंद खोलीत प्रणय रंगलेला. त्याचवेळी अचानक नवरा तिथे येऊन धडकला. नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडलं. विवाहित महिलेच हे प्रकरण पाहून लोकांचा संताप अनावर झाला. संतापलेल्या लोकांनी प्रियकर मोहम्मद कुर्बानला पकडून झाडाला बांधला. त्यानंतर त्याची जोरदार धुलाई केली.
