Heena Gavit : खासदार हिना गावित यांच्या गाडीला अपघात, गावित यांना किरकोळ दुखापत

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या गाडीचा अपघात झाल्याने खासदार किरकोळ जखमी झाल्या आहेत. खासदार हिना गावित यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याचा डॉक्‍टरांकडं सांगण्यात आले आहे.

Heena Gavit : खासदार हिना गावित यांच्या गाडीला अपघात, गावित यांना किरकोळ दुखापत
खासदार हिना गावित यांच्या गाडीला अपघात
Image Credit source: TV9
जितेंद्र बैसाणे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 07, 2022 | 11:29 PM

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांच्या गाडीला अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात हिना गावित यांना किरकोळ दुखापत (Minor Injury) झाली आहे. अचानक दुचाकीसह समोर आल्याने गाडी झाडावर आदळली. दुचाकीस्वारासह खासदार हिना गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस असल्याने पूर्वसंध्येला मोटर सायकल रॅली निघत असतात. त्या मोटरसायकलच्या रॅलीच्या उद्घाटनासाठी शहरातील कोरीट नका येथे शुभारंभ होणार होता. त्यानंतर एका खाजगी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी खासदार हिना गावित कार्यकर्त्यांसोबत जात होते. त्यावेळी शहरातील गुरव चौक येथे अचानक दुचाकीस्वारामध्ये आल्याने खासदार हिना गावित यांची गाडी झाडावर आदळली.

हिना गावित पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या गाडीचा अपघात झाल्याने खासदार किरकोळ जखमी झाल्या आहेत. खासदार हिना गावित यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याचा डॉक्‍टरांकडं सांगण्यात आले आहे. गावित त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते सुभाष पाटील यांना पायाला दुखापत झाली आहे. तर महेंद्र पटेल यांच्या देखील हाताला झाला आहे. जीतू पाटील, प्रतिक जैन यांना किरकोळ दुखापत झाले आहे. मात्र गाडीसमोर आलेल्या दुचाकीवर असलेले महिला आणि पुरुष जखमी झालेले आहे. दुचाकीवर असलेल्या महिलेला दुखापत झाल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यासोबत खासदार गावित आणि कार्यकर्त्यांची देखील प्रगती स्थिर आहे. मात्र पुढील उपचारासाठी डॉक्टर हिना गावित रेल्वेने उपचारासाठी मुंबई येथे निघाल्या आहेत. (MP Heena Gavit car met with an accident, Gavit got minor injuries)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें