AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukhtar Ansari death : मुख्तार अन्सारीची कब्र खोदणारे ते 3 हिंदू कोण? एक पैसाही नाही घेणार, कारण….

आज 30 मार्चला सकाळी 10 वाजता कालीबाग कब्रस्तानमध्ये मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाच सुपुर्द-ए-खाक म्हणजे दफन विधी होणार आहे. तीन हिंदू मजुरांनी मुख्तारची कब्र खोदण्याच काम केलं. त्यासाठी ते एक पैसाही घेणार नाहीयत. मुख्तार अंसारीच गुरुवारी रात्री ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झालं.

Mukhtar Ansari death : मुख्तार अन्सारीची कब्र खोदणारे ते 3 हिंदू कोण? एक पैसाही नाही घेणार, कारण....
Mukhtar Ansari death
| Updated on: Mar 30, 2024 | 8:52 AM
Share

असं म्हणतात, वाईट माणसाच्या मनातही कुठेना कुठे चांगुलपणा असतो. बाहुबली मुख्तार अन्सारीच्या मृत्यूमुळे काहीजण खुश आहेत, तर काही असे सुद्धा आहेत, ज्यांच्यासाठी मुख्तार गॉडफादरपेक्षा कमी नव्हता. अशा लोकांमध्ये मुख्तारचे तीन हिंदू मित्र आहेत. पेशाने हे तिघेही मजूर आहेत. कब्र खोदण्याच काम ते करतात. त्यांच्यासाठी मुख्तार असा मित्र होता, ज्याने नेहमीच वाईट काळात त्यांना साथ दिली. त्यांच्या पाठिशी उभा राहिला. मुख्तारचे त्यांच्यावर उपकार आहेत, म्हणून हे तिन्ही हिंदू मजूर मुख्तारची कब्र खोदण्याचे पैसे घेणार नाहीत. त्यांनी मुख्तारच्या अनेक आठवणी सांगितल्या.

आज 30 मार्चला सकाळी 10 वाजता कालीबाग कब्रस्तानमध्ये मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाच सुपुर्द-ए-खाक म्हणजे दफन विधी होणार आहे. माफिया मुख्तार अंसारीच गुरुवारी रात्री ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झालं. मृतदेहाच्या दफनविधी आधी मुख्तारच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. संपूर्ण मोहम्मदाबाद भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्या तीन हिंदू मजुरांनी मुख्तारची कब्र खोदली, ते त्याचे बालपणीचे मित्र आहेत. तिघेही यूसुफपुर रेल्वे स्टेशनजवळ राहतात. मुख्तारच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर तिघांनाही धक्का बसला. आपला बालपणीचा मित्र आता या जगात नाही, यावर तिघांना विश्वास बसला नाही. कालीबाग कब्रस्तानमध्ये तिघांनी आतापर्यंत अनेक कबरी खोदल्या आहेत.

या कामाचे पैसे घेणार नाही

मुख्तारचा दफनविधी इथेच होणार आहे, हे समजल्यानंतर तिघांनी स्वत: त्याची कब्र खोदली. आपण या कामाचे पैसे घेणार नाही, असं तिघांनी सांगितलं. कारण मुख्तारचे या तिघांच्या कुटुंबावर अनेक उपकार आहेत. मुख्तारचा भाचा शोहेब अंसारीच्या देखरेखीखाली हे कब्र खोदण्याच काम झालं. संजय, गिरधारी आणि नगीना या तीन हिंदू मजुरांनी मिळून हे काम केलं. तिघेही मुख्तारचे बालपणीचे मित्र आहेत.

हे बोलत असताना गिरधारीचे डोळे पाणावलेले

“मुख्तार माझ्यासाठी सर्वकाही होता. त्याने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बरच काही केलय. असा दिवस येईल याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता” असं गिरधारीने सांगितलं. हे बोलत असताना गिरधारीचे डोळे पाणावलेले.

संजय काय म्हणाला?

कब्र खोदणारा दुसरा मजूर संजय म्हणाला की, “त्याच्यावर सुद्धा मुख्तारचे बरेच उपकार आहेत. त्याच्याकडे घर बनवण्यासाठी जमीन नव्हती, तेव्हा मुख्तारचे स्वत:ची जमीन त्याला देऊन टाकली. त्यासाठी मुख्तारने एक पैसाही घेतला नव्हता” “आपली माणस जे करणार नाहीत, ते मुख्तारने बालपणापासून माझ्यासाठी सर्व केलं” असं संजयने सांगितलं.

तिसरा मजूर नगीना म्हणाला की, “मी मागच्या 50 वर्षांपासून मुख्तारला ओळखतो. मुख्तार आणि त्याच कुटुंब नेहमीच माझ्या प्रत्येक सुख, दु:खात सोबत उभ राहिलय” मुख्तारच्या परिवाराला ते आपल कुटुंब मानतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.