AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीचे कपडे घालायचा, अन् चोरी करून… लखपती भामट्याचे कांड पाहून पोलीसही चक्रावले!

मालवण पोलिसानी एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या पैशांतून तो चक्क लखपती झाला आहे.

लेकीचे कपडे घालायचा, अन् चोरी करून... लखपती भामट्याचे कांड पाहून पोलीसही चक्रावले!
mumbai crime news (फोटो सौजन्य- मेटाएआय, सांकेतिक फोटो)
| Updated on: Jun 03, 2025 | 3:05 PM
Share

चोरी करण्यासाठी चोर नवनव्या पद्धती शोधून काढतात. अशीच एक चक्रावरून टाकणारी चोरीची पद्धत एका लखपती चोराने शोधून काढली होती. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत त्यांने अनेक चोऱ्या केल्या होत्या. या चोऱ्यांच्यामध्ये तो सोनं, चांदी, हिरे लुटायचा. याच दागिन्यांच्या मदतीने तो थेट लखपती झाला होता. आता मात्र त्याचं बिंग फुटलं असून मुंबईतील मालाड पोलिसांनी त्याला चक्क 100 सीसीटीव्ही तपासून शोधून काढलं आहे. विशेष म्हणजे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेल्वे ट्रॅकपर्यंत आलेला दिसायचा. नंतर मात्र अचानक गायब व्हायचा. पोलिसांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावून त्याला अटक केली आहे.

रेल्वे ट्रॅकवरून अचानक गायब व्हायचा

मिळालेल्या माहितीनुसार या चोराचे नाव रंजीत कुमार सिंग उर्फ मुन्ना असे असून तो 44 वर्षांचा आहे. हा चोर मुंबई शहरात मुलीचा वेश परिधान करून चोरी करायचा. चोरी केल्यानंतर तो रेल्वे ट्रॅकवरून अचानक गायब व्हायचा. चोरी केलेले सामान विकून हा चोरटा चक्क लखपती झालाय. चोरलेल्या पैशांनी त्याने त्याच्या गावात बंगला बांधला. जमीन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये अँडव्हान्स म्हणून दिले. तसेच मालवणमध्ये घरही घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोने, पैसे आणि सोने वितळवण्याचे यंत्र जप्त केले आहे.

100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

या चोराला पकडण्यासाठी मालाड पोलिसांच्या पथकाने 15 दिवस रेल्वे ट्रॅकवर आरोपीची वाट पाहिली. 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हा आरोपी चोरी करण्याआधी बिहारमधून मुंबईत यायचा. इथं येऊन तो चोरीच्या नवनव्या पद्धती शिकायचा.

मुलींचे कपडे घालायचा अन्…

मालाड पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी जेव्हा घराबाहेर पडायचा तेव्हा त्याच्या मुलीचे कपडे त्याच्या बॅगेत घेऊन जायचा. तो रात्री उशिरा रेल्वे ट्रॅकजवळ जायचा. मुलींचे कपडे घालून मुंबई शहरात जाऊन सोने, चांदीचे दागिने आणि पैसे चोरायचा. जेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला तेव्हा तो रेल्वे ट्रॅककडे जाताना दिसायचा. त्यानंतर मात्र तो गायब व्हायचा. कारण रेल्वे ट्रॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हता. ही बाब समोर आल्यानंतर मालाड पोलिसांच्या डिटेक्शन टीमने 15 दिवस मालाड रेल्वे ट्रॅकवर आरोपीचा माग काढून त्याला अटक केली. त्यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

36 तोळे हिरे अन् मोठं घबाड जप्त

या तपासात पोलिसांना काही धक्कादायक बाबी दिसून आल्या. आरोपीने चोरीच्या पैशातून गावात एक बंगला बांधला आहे. त्याने जमीन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये आगाऊ दिले आणि मुंबईतील मालवणी येथे 10 लाख रुपयांचे घरही खरेदी केले. मालाड पोलिसांनी आरोपींकडून 36 तोळे हिरे, सोन्याचे दागिने, घरातून 1 किलो चांदी, बँक खात्यात जमा केलेले 13 लाख रुपये, सोने वितळवण्याचे यंत्र आणि सुमारे 41 लाख रुपयांचे सामान जप्त केले आहे. हा गुन्हेगार इतका हुशार होता की चोरीनंतर त्याला पोलीस पकडू शकले नाहीत. या आरोपीविरुद्ध मुंबईत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. पण मालाड पोलिसांनी त्याला पहिल्यांदाच अटक केली आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.