त्यानं आधी बापावर चाकूचे सपासप वार केले, नंतर आजोबालाही गाठलं; शेवटी त्यानं जे केलं त्यानं मुंबई हादरली!

मानसिक संतुलन बिघडल्याने तरुणाने वडील आणि आजोबांवरही चाकू हल्ला करुन नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Mulund Boy Suicide Father Grand Father)

  • आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:35 PM, 6 Mar 2021
त्यानं आधी बापावर चाकूचे सपासप वार केले, नंतर आजोबालाही गाठलं; शेवटी त्यानं जे केलं त्यानं मुंबई हादरली!
वडील-आजोबांवर चाकू हल्ला करुन नातवाची आत्महत्या

मुंबई : वडील आणि आजोबांवर चाकूने हल्ला करुन 20 वर्षीय तरुणाने इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत तिघांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईतील मुलुंड भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मांगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Mumbai Crime News Mulund Boy Commits Suicide after killing Father Grand Father)

मुलुंडमधील लाल बहादूर शास्त्री मार्गावर वसंत ऑस्कर सोसायटीत हा प्रकार घडला. बिल्डिंगवरुन उडी मारल्यामुळे एक तरुण जखमी अवस्थेत पडला आहे, अशी माहिती सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाली.

मानसिक संतुलन बिघडल्याने चाकू ह्लला?

पोलिसांच्या मोबाईल वॅनने जखमी तरुण शार्दुल मिलिंद मांगले याला मुलुंडमधील अग्रवाल हॉस्पिटलला नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. मृत तरुणाबद्दल अधिक चौकशी केली असता केली असता त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने घरी वडील आणि आजोबांवरही हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा अंत

55 वर्षीय वडील मिलिंद सुरेश मांगले आणि 85 वर्षीय आजोबा सुरेश केशव मांगले यांना घरातील चाकूने मारुन जखमी केले होते. मांगले पितापुत्रालाही अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांनाही मयत घोषित केले. एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांतील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbai Crime News Mulund Boy Commits Suicide after killing Father Grand Father)

कोणाकोणाचा मृत्यू

1. शार्दुल मिलिंद मांगले, वय 20 वर्ष
2. मिलिंद सुरेश मांगले, वय 55 वर्ष
3. सुरेश केशव मांगले, वय 85 वर्ष

घटनास्थळी जाऊन पोलीस दुहेरी हत्या आणि आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे मांगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

मृतदेह चिखलात पालथा, तोंडात सहा-सात रुमाल कोंबलेले, पहिल्यांदा मृतदेह पाहिलेल्या तरुणांची धक्कादायक माहिती

कवठेमहांकाळ पुन्हा हादरले, माजी सरपंचाच्या भाच्याला भरचौकात भोसकले

(Mumbai Crime News Mulund Boy Commits Suicide after killing Father Grand Father)