Bhandup Fire : भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये पुन्हा एकदा अग्नीतांडव, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

गेल्या वर्षीही याच मॉलमध्ये आग लागली होती. 27 एप्रिल 2021 रोजी या मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. सुमारे 11 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली होती.

Bhandup Fire : भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये पुन्हा एकदा अग्नीतांडव, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये पुन्हा एकदा अग्नीतांडव
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 1:11 AM

मुंबई : भांडुप पश्चिमेतील ड्रीम मॉल (Dream Mall)ला पुन्हा एकदा आग (Fire) लागली आहे. आगीने रौद्र रुप धारण केले असून अग्निशमन दला (Fire Brigade)ने लेव्हल 3 ची घोषणा केली आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. गेल्या वर्षीही याच मॉलमध्ये भीषण आग लागली होती. मॉल बंद असल्याने यात कोणीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाहीये. परंतु आगीने पुन्हा एकदा मॉलला वेढा दिल्याने मॉलमधील उरली सुरली दुकानातील साहित्यही जळून खाक झाले आहे. (A huge fire broke out in Bhandup’s Dream Mall once again, No casualties were reported)

गेल्या वर्षीही याच मॉलमध्ये लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता

गेल्या वर्षीही याच मॉलमध्ये आग लागली होती. 27 एप्रिल 2021 रोजी या मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. सुमारे 11 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली होती. या रुग्णालयात 76 कोरोना रुग्ण उपचार घेत होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्र रुप धारण केले अन् आग रुग्णालयापर्यंत पसरली. आग चारही बाजूने पसरल्याने अग्नीशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

गेल्या वर्षी झालेल्या अग्नीतांडवानंतर विरोधकांकडून महापालिका प्रशासनावर अनेक ताशेरे ओढले गेले होते. महापौरांनी आग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेला अद्याप एक वर्ष पूर्ण होत नाही तोवर पुन्हा एकदा या मॉलमध्ये अग्नीकल्लोळ माजला आहे. अग्नीशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या सगळ्यामुळे महापालिका प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. (A huge fire broke out in Bhandup’s Dream Mall once again, No casualties were reported)

इतर बातम्या

Sangamner Crime : धक्कादायक ! विहिरीत आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह, घातपात की आत्महत्या ?

Supreme Court : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत असाल तर सावध व्हा… ; सुप्रीम कोर्टाने घेतला हा निर्णय

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.