Mumbai Fraud : जेष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे पैसे लुटायचा, फिल्म इंडस्ट्रीतील स्पॉट बॉयला अटक

आरोपी अशोक वर्मा हा एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची देवाणघेवाण करायचा. त्यांच्या खात्यातून पैसे काढायचा.

Mumbai Fraud : जेष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे पैसे लुटायचा, फिल्म इंडस्ट्रीतील स्पॉट बॉयला अटक
जेष्ठ नागरिकाला लुटणारा आरोपी जेरबंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:16 PM

मुंबई : जेष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक (Fraud) करणाऱ्या ठगाला बोरिवली पोलिसांनी अटक (Arrest) केले आहे. अशोक घनश्याम वर्मा (27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत असून फिल्म इंडस्ट्रीत स्पॉट बॉय (Spot Boy)चे काम करतो. आरोपींकडून विविध बँकांचे 37 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने 50 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला अटक

आरोपी अशोक वर्मा हा एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची देवाणघेवाण करायचा. त्यांच्या खात्यातून पैसे काढायचा. आरोपीने बोरिवली रेल्वे स्थानकावर असलेल्या एटीएम सेंटरमध्ये एका ज्येष्ठ नागरिक महिलेला पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तिचे एटीएम कार्ड बदलले आणि तिच्या खात्यातून पैसे काढले. महिलेला फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तिने बोरिवली जीआरपी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिस बोरिवली रेल्वे स्थानकातील एटीएमवरही लक्ष ठेवून होते. याच दरम्यान आरोपी पुन्हा एटीएमजवळ आला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी विरोधात बोरिवली व्यतिरिक्त पायधुनी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.

दादरमधून दुचाकी चोरांना अटक

जालना येथे दुचाकी चोरुन मुंबईत विकणाऱ्या दोन चोरट्यांना समता नगर पोलिसांनी दादरमधील स्वामी नारायण मंदिराजवळून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या 9 दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी जालनातून दुचाकी चोरुन मुंबईत विकायचे. तर मुंबईतील चोरलेल्या दुचाकी जालना आणि औरंगाबाद येथील शेतकऱ्यांना विकायचे. पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरलेल्या 9 दुचाकी आरोपींकडून हस्तगत केल्या आहेत. (Accused who robbed senior citizens on the pretext of helping them was arrested)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.