AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसात हेडफोन घालून जाणं तरुणाच्या जीवावर बेतलं; मुंबईमध्ये नेमकं काय घडलं? तुमच्या अंगावर येईल काटा

Bhandup Shocking News : मुंबईतील भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

पावसात हेडफोन घालून जाणं तरुणाच्या जीवावर बेतलं; मुंबईमध्ये नेमकं काय घडलं? तुमच्या अंगावर येईल काटा
| Updated on: Aug 20, 2025 | 11:55 AM
Share

कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे.मुंबईतील भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीपक पिल्लई हा एल. बी.एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर उघडी होती. ज्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. तिथल्या प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले. परंतु कानातल्या हेडफोनमुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या तारांच्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही नागरिकांचे जीव वाचले. पण दीपकला वाचवता आले नाही. त्याच्या कानात हेडफोन होता. त्याला नागरिकांनी हाका मारल्या. त्याला आवाज दिला. पण हेडफोन लालेले असल्याने त्याला नागरिकांचा आवाज ऐकू आला नाही आणि वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

महावितरणवर नागरिकांचा संताप

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर महावितरणला पण याची नागिरकांनी सूचना केली. पावसाळ्यात अशा उघड्या तारा अनेकांसाठी प्राणघातक ठरत आहे. महावितरणने तात्काळ याबाबत माहिती घ्यायला हवी होती. हलगर्जीपणामुळे एका तरुणाला जीव गमावावा लागल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर रस्त्यावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हेडफोनपेक्षा प्राण महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्युत तारा अथवा लोखंडी विद्युत खांबाला पावसात हात न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या दीपकच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला आहे. दीपक काही वेळेपूर्वीच घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांना धक्का बसला.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?