AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोरीवली येथील वझिरा नाका इथं इमारतीचा भाग कोसळला, धडकी भरवणारे फोटो समोर

वझिरा नाका येथे 3 मजली इमारतीचा भाग कोसळला! किती नुकसान? ढिगाऱ्याखाली कोण अडकलं?

बोरीवली येथील वझिरा नाका इथं इमारतीचा भाग कोसळला, धडकी भरवणारे फोटो समोर
बोरीवलीतील मोठी बातमीImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Oct 28, 2022 | 4:43 PM
Share

मुंबई : मुंबईतून (Mumbai News) एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईच्या पश्चिम उपनगर येथील बोरीवलीच्या (Boriwali) वझिरा नाका (Wazira Naka Boriwali) इथं एका इमारतीचा काही भाग कोसळला.  3 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे इमारतची भाग कोसळल्यानंतरची थरकाप उडवणारी काही दृश्य समोर आली आहे. ANI वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 4 ते 5 गाड्या या इमारतीच्या ढिगाऱ्यााखाली गाडल्या गेल्या. यात गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, जीवितहानीचं अद्यापतरी कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही.

वझिरा नाका इथं झालेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यामार्फक सध्या बचावकर्य केलं जातंय. ढिगाऱ्याखाली कुणीली अडकलेलं तर नाही ना, या दृष्टीने तपास केला जातो आहे.

पाहा फोटो :

समोर आलेल्या काही फोटोमध्ये काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पार्क केलेल्या वाहनांवरच इमारतीचा भाग कोसळल्यानं एकच खळबळ उडाली होती. एक टेम्पो ट्रॅव्हलर, इनोव्हा आणि व्हॅगेनार कारसह इतरही काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली गेल्याचं दिसून आलंय.

सध्या या ठिकणी ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. परिसरात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. नेमका या इमारतीचा भाग कशामुळे कोसळला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकेललं नाही.

पालिका अधिकाऱ्यांसह, पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणाही या ठिकाणी बचावकार्यासाठी दाखल झाली आहे. आता क्रेनच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे. या गाड्यांचा चक्काचूर झाल्याने गाडी मालकांना आर्थिक फटका बसलाय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.