AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fraud : बँक खाते भाड्याने देऊन ऑनलाईन फसवणूक करायचे, वाचा नक्की काय आहे मोडस ऑपरेंडी?

दोन्ही आरोपी मूळचे झारखंडमधील जामतारा येथील रहिवासी आहेत. एक गोरेगाव येथे रिक्षाचालक चालवतो तर दुसरा धारावी येथे रिक्षा चालवतो. दोन्ही आरोपींची वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती आहेत. एका आरोपीची 20 खाती तर दुसऱ्याची 30 बँक खाती आहेत.

Mumbai Fraud : बँक खाते भाड्याने देऊन ऑनलाईन फसवणूक करायचे, वाचा नक्की काय आहे मोडस ऑपरेंडी?
गुन्हेगारांना बँक खाते भाड्याने देणाऱ्या दोघांना अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 5:16 PM
Share

मुंबई : गुन्हेगार फसवणुकीसाठी कोणता मार्ग अवलंबतील याचा नेम नाही. बोरीवली पोलिसांनी एक असा गुन्हा उघडकीस आणला आहे, जे ऐकल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावतील. सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी आरोपी चक्क आपले बँक खाते भाड्याने देत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोपी 10 टक्के कमिशन द्यायच्या अटीवर सायबर गुन्हेगारांना आपले बँक खाते भाड्याने द्यायचे. बोरीवली जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही आरोपी मुंबईतील गोरेगाव आणि धारावी परिसरातील असून, पेशाने रिक्षाचालक आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

दोन्ही आरोपी मूळचे झारखंडमधील जामतारा येथील रहिवासी आहेत. एक गोरेगाव येथे रिक्षाचालक चालवतो तर दुसरा धारावी येथे रिक्षा चालवतो. दोन्ही आरोपींची वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती आहेत. एका आरोपीची 20 खाती तर दुसऱ्याची 30 बँक खाती आहेत. दोघेही 10 टक्के कमिशनवर आपली खाती सायबर गुन्हेगारांना भाड्याने द्यायचे.

‘असा’ झाला गुन्हा उघड

बोरिवली जीआरपीकडे एक ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये तक्रारदाराच्या मोबाईलवर एक एसएमएस आला होता, ज्यामध्ये बँकेचे केवायसी अपडेट करण्याचे लिहिले होते.

तक्रारदाराने त्या लिंकवर क्लिक करून बँकेचा सर्व डेटा भरल्यानंतर काही वेळाने या गुन्हेगारांनी तक्रारदाराच्या खात्यातून 40 हजार रुपये आपल्या खात्यात वळते केले.

बोरिवली जीआरपीने या घटनेचा तपास सुरु केला असता तक्रारदाराचे पैसे ज्या खात्यात गेले त्या खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. धारावीतून एकाला आणि गोरेगाव येथून दुसऱ्याला अटक केले.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.