AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांना जेल की बेल ? न्यायालयात आज काय झाले ? वाचा सविस्तर

देशमुख यांनी गृहमंत्री पदावर असताना आपल्या पदाचा गैरवापर केला. प्रभाव टाकून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अनिल देशमुखांना जेल की बेल ? न्यायालयात आज काय झाले ? वाचा सविस्तर
अनिल देशमुखImage Credit source: twitter
| Updated on: Sep 28, 2022 | 9:27 PM
Share

मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय आज सुनावणी पूर्ण झाली. मात्र कोर्टाने जामीन अर्जावर आपला निर्णय राखून ठेवला आहे. लवकरच यावर निर्णय होणार अशी अपेक्षा आहे. पण ईडीतर्फे देशमुख यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला आहे. देशमुखांवर मनी लाँड्रिंग (Money Laundering)चे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे त्यांना नियमित जामीन (Bail) देण्यात येऊ नये असा युक्तीवाद ईडीतर्फे करण्यात आला. त्याचबरोबर वैद्यकीय आधारावर ही देशमुख यांना जामीन देता येणार नाही कारण त्यांच्या सदर जामीन अर्ज हा वैद्यकीय जामीन अर्ज नाही असं युक्तिवाद ईडी तर्फे अॅड. अनिल सिंग यांनी आज मुंबई हायकोर्टात केलाय.

देशमुख यांनी गृहमंत्री पदावर असताना आपल्या पदाचा गैरवापर केला. प्रभाव टाकून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते सक्रियपणे मनी लॉन्ड्रींगमध्ये सहभागी होते, असंही दिसून आलेले आहे.

ईडीचे वकील काय म्हणाले ?

देशमुखांच्या आदेशानुसार सचिन वाझेच्या मार्फत मुंबईतील आर्केस्ट्रा बार मालकांकडून वसुली केली जात होती. वसुलीचे पैसे नंतर मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमाने त्यांच्या शैक्षणिक ट्रस्टमध्ये वळवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ईडीतर्फे आज युक्तिवादादरम्यान करण्यात आला.

मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार हा हत्या किंवा दहशतवादाप्रमाणेच आहे. म्हणून असे भ्रष्टाचार मुळापासून संपवणे गरजेचे आहे, असे ईडीचे वकील अनिल सिंग म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेच्या साक्षीसंदर्भात अनेक प्रश्न, संशय व्यक्त केला जाऊ शकतो. वाझे यांनी केलेल्या विधानावर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील अॅड. विक्रम चौधरी यांनी केला होता.

यासाठी मिड टर्म ट्रायल आता नको असं म्हणत, कोणती साक्ष कितपत खरी आहे हे ठरवण्याचा अधिकार ट्रायल कोर्टाला आहे आणि ट्रायलच्या वेळी हे निश्चित होणार, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हायकोर्टात सुनावणी

माजी गृहमंत्री देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते. कारण काही कारणास्तव ही सुनावणी एका खंडपीठाकाडून दुसऱ्या खंडापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे.

सुनावणी दरम्यान अनिल देशमुख यांचे वकील अॅड. विक्रम चौधरी यांनी दावा केला होता की, या प्रकरणात नंबर वन परमबीर सिंह होते. तर आज ईडीतर्फे सचिन वाझेचा हवाला देत अॅड. अनिल सिंह यांनी दावा केला की नंबर वन हे अनिल देशमुखच होते.

वाझे यांनी आपल्या मोबाईलमध्ये देशमुख यांचे नाव नंबर वन म्हणून सेव्ह केले होते. देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना अनेक आजार आहेत. मात्र त्यांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहेत.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.