AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : ‘100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा!’ चक्क आमदारालाच ऑफर आल्यानं खळबळ, चौघांना अटक, नेमकं प्रकरण काय?

'मोठी व्यक्ती आपलं काम करुन देईल, पण त्यासाठी 100 कोटी रुपये द्यावे लागतील'

Mumbai Crime : '100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा!' चक्क आमदारालाच ऑफर आल्यानं खळबळ, चौघांना अटक, नेमकं प्रकरण काय?
मंत्रिपदासाठी कोट्यवधी...Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 20, 2022 | 9:19 AM
Share

मुंबई : एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळ (State Cabinet Ministry) विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे चक्क मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी देण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 100 कोटी द्या, मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर चक्क एका आमदाराच देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर क्राईम ब्रांचच्या (Mumbai Police Crime Branch) पथकाने कारवाई करत चौघा भामट्यांचा शोध घेत त्यांना अद्दल अडवली आहे. रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्लाय चौघांची नावं आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. 2019 साली राहुल कुल यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अखेर या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जातेय.

कशी दिली ऑफर?

12 तारखेला रियाज शेख यांने आमदारासोबत संपर्क साधला आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देतो, अशी ऑफर दिली. एक मोठी व्यक्ती आपलं काम करुन देईल, पण त्यासाठी 100 कोटी रुपये द्यावे लागतील, असं त्यानं आमदार साहेबांना सांगितलं. नंतर 100 ऐवजी 90 कोटी रुपयांत काम होईल, अशीही डील करण्याचा प्रयत्न झाला. पण आधी 20 टक्के रक्कम द्या, अशी मागणी रियाजने केली होती. आमदार साहेबांनीही 20 टक्के रक्कम देऊ, असं मान्य केलं. तोपर्यंत कुणाला कळणार नाही, अशाप्रकारे या सगळ्याबाबत पोलिसांनाही माहिती दिली.

सोमवारी रियाज 18 कोटी घेण्यासाठी ऑबेरॉय हॉटेलमध्ये आला. ठरल्याप्रमाणे आमदारसाहेबही तिथे होते. अखेर जेव्हा रियाज आमदारांना भेटण्यासाठी आला, तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडला. यानंतर रियाझला पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. तपासादरम्यान, रियाझने आपले सगळे पत्ते उघड केले.

योगेश कुलकर्णी आणि सागर संवगवई यांच्याशी संगनमत करुन आमदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं तपासातून निष्फन्न झालं. त्यानंतर याच प्रकरणात सागर आणि योगेशसह जाफर उस्मान याचाही या सगळ्यात हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांकडून सात मोबाईल फोन आणि सीमकार्डही हस्तगत करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या सगळ्या जप्त केलेल्या मुद्देमालाच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

व्हॉट्सअपवर घेतला आमदाराचा बायोडेटा

योगेश कुलकर्णी याने रियाजकडून आमदाराचा बायोडेटा व्हॉट्सअपवर मागवून घेतला. त्यानंतर तो सागरला फॉरवर्ड केल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलंय. योगेशने रियाजची सागरशी ओळख करुन दिली होती. दिल्लीतील सागरचा माणूस मंत्रिपदाचं काम करुन देईल, असं रियाजला सांगण्यात आलं. त्यासाठी 50-60 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी डील झाली असल्याचंही तपासातून समोर आलंय.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?