लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत तब्बल 50 मोबाईल फोन, दागिने लंपास! तक्रार करण्यासाठी गणेशभक्तांची स्टेशनसमोर रांग

लालबागचा राजा मिरवणुकीत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण अखेरच्या दिवशी लालबाग परिसरात येत असतात. यावेळी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या गर्दीचा गैरफायदा घेत भामट्यांनी सामान्यांचे मोबाईल आणि दागिने लंपास केलेत.

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत तब्बल 50 मोबाईल फोन, दागिने लंपास! तक्रार करण्यासाठी गणेशभक्तांची स्टेशनसमोर रांग
विसर्जन मिरवणुकीतील गर्दीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 6:39 AM

मुंबई : शुक्रवारी मोठ्या थाटामाटात मुंबई आणि परिसरात गणपती बाप्पाची (Ganpati Visarjan 2022) विसर्जन मिरवणूक पार पडली. कोरोनानंतर दोन वर्षांनी पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मिरवणुकीत मुंबईकरांनी (Mumbai crime News) मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरांनीही हातचलाखी केली. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरट्यांनी तब्बल 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने चोरले. त्यामुळे गणेशभक्तांना मोठा फटका बसला.

हे सुद्धा वाचा

चोरीच्या तक्रारीसाठी रांग..

एकीकडे गेले दहा दिवस लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी तासनतास रांग लावल्याचं पाहायला मिळालं होतं. तर गणपती विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी गणेशभक्तांना पुन्हा एकदा रांगेतच उभं राहावं लागलंय. फक्त ही रांग चक्क पोलीस स्थानकाच्या बाहेर लावण्यात आली होती. याचं कारण ठरलं विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ!

गणपती मिरवणुकीत चोरीला गेलेल्या सामानाची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांनी गर्दी केली. प्रत्येकाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते.

दुपारच्या सुमारास चोरट्यांचा धुमाकूळ

गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. लालबागचा राजा मिरवणुकीत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण अखेरच्या दिवशी लालबाग परिसरात येत असतात. यंदा विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या गर्दीचा गैरफायदा घेत भामट्यांनी सामान्यांचे मोबाईल आणि दागिने लंपास केलेत.

जवळपास 50 चोरीच्या तक्रारी काळाचौकी पोलिसांत नोंदवण्यात आल्या आहेत. अज्ञात चोरांविरोधात गुन्हे दाखल करुन घेण्यात आले आहेत. आता या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. याआधी पुण्यातही मोबाईल चोरी करणाऱ्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. आता दुकानं आणि इतर व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. त्यातून या चोरांचा शोध लागतो का आणि त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.