CCTV | टेम्पो रिव्हर्स घेताना महिलेला जबर धडक, वसईत 60 वर्षीय महिला गंभीर जखमी

CCTV | टेम्पो रिव्हर्स घेताना महिलेला जबर धडक, वसईत 60 वर्षीय महिला गंभीर जखमी
वसईत छोटा हत्ती टेम्पोने महिलेला चिरडलं
Image Credit source: टीव्ही9

या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. वसई पूर्व भागातील गोकुळ पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ही घटना घडली आहे.

विजय गायकवाड

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 16, 2022 | 1:25 PM

वसई : छोटा हत्ती टेम्पो चालकाने महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. मुंबईजवळच्या वसई शहरात (Vasai) गाडी रिव्हर्स घेताना चालकाने महिलेला (Tempo Accident) चिरडलं. यामध्ये 60 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. ड्रायव्हर सोसायटीच्या आवारात उभा असलेला छोटा हत्ती टेम्पो मागे घेत होता. यावेळी मागून जाणाऱ्या महिलेला जोराची धडक बसली. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे. महिलेचा उजव्या बाजूचा खांदा आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सध्या तिच्यावर वसईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

छोटा हत्ती टेम्पो चालकाने गाडी पाठीमागे घेताना 60 वर्षीय महिलेला जोराची धडक देऊन अक्षरशः चिरडल्याची घटना समोर आली आहे. सोसायटी आवारात कचरा टाकून जात असताना त्याच सोसायटीमध्ये उभा असलेल्या छोटा हत्ती टेम्पो चालकाने टेम्पो पाठीमागे घेऊन महिलेला जोराची धडक दिली आहे.

या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. वसई पूर्व भागातील गोकुळ पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ही घटना घडली आहे.

महिला गंभीर जखमी, टेम्पो चालकावर गुन्हा

या घटनेत वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. काकोली मित्रा असे जखमी महिलेचे नाव आहे. तिचा उजव्या बाजूचा खांदा, पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सध्या तिच्यावर वसई पूर्वेच्या एव्हरशाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात टेम्पो चालक, मालका विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

खोपोली-पेण मार्गावर अपघात! वळण न घेता आल्यानं रिक्षा जागीच उलटली, एकाचा मृत्यू, तर 1 जखमी

भीषण अपघात, धारुरच्या घाटातून ट्रक खाली कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें