रिक्षा चालकाची गोळ्या झाडून हत्या, मुंबईतील धारावीत थरार, महिलेवर संशय

दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्याच्यावर नजीकच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी त्याचे निधन झाले.

रिक्षा चालकाची गोळ्या झाडून हत्या, मुंबईतील धारावीत थरार, महिलेवर संशय
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 11:53 AM

मुंबई : गोळीबारात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा (Auto Rickhaw Driver Murder) उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईत हा धक्कादायक प्रकार (Mumbai Crime News) घडल्याचं उघडकीस आलं आहे. धारावी येथे दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Dharavi Firing) होत्या. यामध्ये 30 वर्षीय रिक्षा चालक आमिर अनिस खान जखमी झाला होता. रविवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. सायन रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी धारावीत आमिरवर चार राऊंड गोळीबार करणाऱ्या दोन संशयितांचा शोध धारावी पोलीस आणि शहर गुन्हे शाखा घेत आहेत. दोन गटांमधील वादातून रिक्षा चालकाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

काय आहे प्रकरण?

गोळीबारात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मुंबईतील धारावी परिसरात मिठी नदीजवळ असलेल्या पिवळा बंगला भागात शनिवारी ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्याच्यावर नजीकच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी त्याचे निधन झाले.

महिलेची चौकशी सुरु

पोलिसांनी सांगितले की, त्याच्या छातीवर आणि पाठीवर दोन गोळ्या लागल्या होत्या, तर इतर दोन गोळ्या त्याच्या हाताला लागल्या होत्या. गोळीबार प्रकरणी आम्ही एका महिलेची चौकशी करत आहोत. आमची टीम आमिर अनिस खानवर गोळीबार करणाऱ्या दोघा जणांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या :

37 वर्षीय पत्रकाराची भररस्त्यात हत्या, अडीच वर्षांच्या लेकीसह कुटुंबातील चौघांसमोर संपवलं

डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडात आणखी एक खुलासा; पती संदीपभोवतीचा फास का झाला घट्ट?

मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.