Jyotsna Rasam | राणी मुखर्जीला ट्रेनिंग देणारी ‘मर्दानी’ पोलीस अधिकारी करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास

स्त्री भ्रूणहत्येबाबत जनजागृतीसाठी 11 दिवसांत 13 राज्यांमध्ये चारचाकी गाडीने 6 हजार 580 किलोमीटरचा प्रवास करत 'फास्टेस्ट वूमन' म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योत्स्ना रासम यांची नोंद करण्यात आली होती. अभिनेत्री राणी मुखर्जीला ‘मर्दानी’ चित्रपटातील लेडी पोलीस ऑफिसरच्या व्यक्तिरेखेसाठी ज्योत्स्ना रासम यांनीच प्रशिक्षण दिलं होतं.

Jyotsna Rasam | राणी मुखर्जीला ट्रेनिंग देणारी 'मर्दानी' पोलीस अधिकारी करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास
Jyotsna Rasam

मुंबई : मुंबईतील साकीनाका भागात बलात्कार (Sakinaka Rape Case) झालेल्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आतडे कापून प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून महिलेवर अमानवी अत्याचार करण्यात आले होते. या बलात्कार प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या डॅशिंग महिला पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम (Jyotsna Rasam) करणार आहेत.

कोण आहेत ज्योत्स्ना रासम?

27 वर्षांपूर्वी ज्योत्स्ना रासम पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या होत्या. सध्या त्या राज्य गुप्तचर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ज्योत्स्ना रासम यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. यात मुद्रांक घोटाळा, अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरण, 2011 मध्ये हैदराबादहून मुंबईला हिरे आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपींची अटक, दुबईच्या रोशन अन्सारीची अटक अशा प्रकरणांचा समावेश आहे.

‘फास्टेस्ट वूमन’

स्त्री भ्रूणहत्येबाबत जनजागृतीसाठी 11 दिवसांत 13 राज्यांमध्ये चारचाकी गाडीने 6 हजार 580 किलोमीटरचा प्रवास करत ‘फास्टेस्ट वूमन’ म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली होती. अभिनेत्री राणी मुखर्जीला ‘मर्दानी’ चित्रपटातील लेडी पोलीस ऑफिसरच्या व्यक्तिरेखेसाठी ज्योत्स्ना रासम यांनीच प्रशिक्षण दिलं होतं.

या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

तीन दिवस मृत्यूशी झुंज

या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 संबंधित बातम्या 

Mumbai Sakinak Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI