VIDEO | Dombivli मध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसलेल्या दारुड्याला महिलेचा चोप

ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेने मद्यधुंद व्यक्तीला यथेच्छ चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्युटी पार्लरमध्ये घुसलेला तरुण बाहेर जाता जात नव्हता, अखेर पारा चढलेल्या महिलेने रणरागिणीचा अवतार घेत त्याला इंगा दाखवल्याची माहिती आहे.

VIDEO | Dombivli मध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसलेल्या दारुड्याला महिलेचा चोप
डोंबिवलीत महिलेचा दारुड्याला चोप
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 1:57 PM

डोंबिवली : महिलेने दारुड्याला (Drunkard) बेदम चोप दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlor) घुसल्यामुळे महिलेने त्याला बदडल्याची माहिती आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) शहरात घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत ब्युटी पार्लरमध्ये शिरला होता. महिलेने विनंती करुनही तो ब्यूटी पार्लरमधून बाहेर निघत नव्हता. अखेर संतापलेल्या महिलेने त्याला ब्युटी पार्लरच्या बाहेर काढले. त्यानंतर भर रस्त्यातच त्याला चोप दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेने मद्यधुंद व्यक्तीला यथेच्छ चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्युटी पार्लरमध्ये घुसलेला तरुण बाहेर जाता जात नव्हता, अखेर पारा चढलेल्या महिलेने रणरागिणीचा अवतार घेत त्याला इंगा दाखवल्याची माहिती आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात घडली आहे. दारुडा संबंधित ब्युटी पार्लरमध्ये शिरला होता. महिलेने विनंती करुनही तो ब्यूटी पार्लरमधून बाहेर निघायला तयार होत नव्हता. अखेर संतापलेल्या महिलेने त्याला ब्युटी पार्लरच्या बाहेर काढले. त्यानंतर भर रस्त्यातच त्याला चोप दिला. अगदी लाथाही आणत त्याला अद्दल घडवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Vasai मध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; बेदम मारहाण, दुचाकीही फोडली

‘ये XXX रोता क्यू है’, नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार

वारंवार Horn वाजवणाऱ्या महिलेला दाखवलं मिडल फिंगर, तरुणाला नागरिकांकडून मारहाण