Mumbra Loot | मुंब्य्रातील खेळणी व्यापाऱ्याकडून 6 कोटींची लूट, तीन अधिकाऱ्यांसह 10 पोलीस निलंबित

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी 30 वेगवेगळ्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी या प्रमाणे 30 कोटी रुपये दडवून ठेवल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना 12 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास मिळाली होती

Mumbra Loot | मुंब्य्रातील खेळणी व्यापाऱ्याकडून 6 कोटींची लूट, तीन अधिकाऱ्यांसह 10 पोलीस निलंबित
मुंब्रा पोलिसांवर लुटीचा आरोपImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 9:01 AM

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात खेळणी व्यापारी फैजल मेनन (Faijal Menon) याच्याकडून पोलिसांनी (Mumbra Police) सहा कोटी रुपये लुटल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. मेननच्या घरावर धाड मारत पोलिसांनी 30 कोटी रुपये जप्त केले आणि 24 कोटी रुपये परत केल्याचा आरोप होत आहे. एका पत्रामुळे महिनाभरानंतर पोलिसांची पोलखोल झाली. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspend) करण्यात आलं आहे. तर एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. पोलीस ठाण्यात पैशांचे बॉक्स घेऊन येतानाचा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी 30 वेगवेगळ्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी या प्रमाणे 30 कोटी रुपये दडवून ठेवल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना 12 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास मिळाली. या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, मदने यांच्यासह तीन साक्षीदारांना घेत मेमन यांच्या घरी धाड टाकली. या ठिकाणी तब्बल 30 खेळण्यांच्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये पोलिसांना आढळून आले. हे पैसे घेऊन मेमनसह पोलिसांचे पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी हा काळा पैसा आहे, त्यातील अर्धी रक्कम आम्हाला दे, अशी मेमन यांना पोलिसांनी दमदाटी केल्याचे तक्रारदार इब्राहिम शेख यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिलेल्या अर्जात नमूद केले होते.

मेमन यांनी पोलिसांना दोन कोटी देण्याचे कबूल केले, मात्र पोलिसांनी सहा बॉक्स स्वतःकडे ठेवून घेतले. यामध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये होते. पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये हे सहा कोटी रुपये मोजून ठेवले. पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार उघडकीस येईल, असा दावा अर्जदार इब्राहिम शेख याने केला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, ठाण्याचे सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनाही शेख यांनी अर्जाची प्रत रवाना केली होती.

हे सुद्धा वाचा

दहा पोलिसांचे निलंबन

याच प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि सात कर्मचारी ठाणे पोलिसांनी निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे, तसेच सर्व निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त करणार असून तसे ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांचे आदेश दिले आहेत.

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.