मंदिर परिसरात वादावादी, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 8:54 AM

अंबरनाथ पूर्वेच्या शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ब्राम्हणपाडा भागात राहणारा होता

मंदिर परिसरात वादावादी, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
मयत भाविक शिंदे

Follow us on

अंबरनाथ : मंदिर परिसरात झालेल्या वादावादीनंतर 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भाविक शिंदे असं मयत तरुणाचं नाव आहे. भाविकच्या हत्येनंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (21 years old boy killed in Ambernath)

नेमकं काय घडलं

अंबरनाथ पूर्वेच्या शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ब्राम्हणपाडा भागात राहणारा होता. भाविक आपल्या मित्रांसोबत तिथे आला असताना आरोपींसोबत त्याचा वाद झाला होता. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर पुढील तपास आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या

दरम्यान, प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये घडली होती. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला होता. विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

विजय हा अंबरनाथमध्ये रिक्षाचालक होता. विजयचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या समाजातील असलेल्या या तरुणांच्या मनात गेले अनेक महिने याबाबत खदखद होती. विजय याच्या प्रेम विवाहाचा राग मनात धरुन काही तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या, उशीने तोंड दाबून जीव घेतला

तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या भावाची लष्कर भरती करतो, 57 जणींना गंडवणारा ‘दादला’ पुण्यात अटकेत

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI