अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या, हत्येची संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित

आज दुपारी 3.30 च्या सुमारास ५ ते ७ तरुण विजयच्या घरी आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करीत विजयला घराबाहेर आणले. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. (Murder of a young man in a love marriage dispute in Ambernath, the whole incident of murder is captured in the mobile)

अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या, हत्येची संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित
अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये प्रेमविवाह केल्याच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. विजय हा अंबरनाथमध्ये रिक्षाचालक होता. विजय याचा आंतरजातीय प्रेमविवाद होता. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या समाजातील असलेल्या या तरुणांच्या मनात गेले अनेक महिने याबाबत खदखद होती. विजय याच्या प्रेमविवाहाचा राग मनात धरुन काही या तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला. (Murder of a young man in a love marriage dispute in Ambernath, the whole incident of murder is captured in the mobile)

घटना नेमकी काय?

विजय याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमला राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर विजय आपल्या पत्नीसह अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला गेले काही दिवस त्रास देत होते. आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून हे तरुण विजयला त्रास देत होते. या वादातूनच आज दुपारी 3.30 च्या सुमारास 5 ते 7 तरुण विजयच्या घरी आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करीत विजयला घराबाहेर आणले. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. गुंड तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत, यानंतर विजयच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.

मोबाईलमध्ये घटना चित्रित

मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जात असताना दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Murder of a young man in a love marriage dispute in Ambernath, the whole incident of murder is captured in the mobile)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI