लस न घेताच अ‍ॅपवर लसीकरणाचं सर्टिफिकेट, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

सध्या लसीकरण मोहिमेतले नवनवीन गोंधळ दररोज समोर येत आहेत. आता तर लस न घेता एका व्यक्तीला लस घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लस न घेताच अ‍ॅपवर लसीकरणाचं सर्टिफिकेट, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार
कोरोना लसीकरण

अंबरनाथ (ठाणे) : सध्या लसीकरण मोहिमेतले नवनवीन गोंधळ दररोज समोर येत आहेत. आता तर लस न घेता एका व्यक्तीला लस घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात असलेल्या करवले इथं हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संबंधित व्यक्तीला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. याशिवाय त्या व्यक्तीचं अद्यापही लसीकरण झालेलं नाही.

नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथच्या बारकूपाडा भागात राहणारे अशोक जाधव यांनी ऑनलाईन पद्धतीने कोविड लसीकरणाची नोंदणी केली होती. ठरलेल्या वेळी ते मलंगगड परिसरातील करवले गावातल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले. मात्र गर्दीमुळे 5 तास उभं राहूनही त्यांना लस मिळाली नाही आणि ते घरी परतले. यानंतर अशोक जाधव दुसऱ्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता तिथे तुमचं लसीकरण झालं असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्याचं सर्टिफिकेटही त्यांच्या अ‍ॅपमध्ये आलं होतं. मात्र लस न घेताच लसीकरण झाल्याची नोंद झाल्यानं अशोक जाधव यांना धक्का बसला.

दोन दिवसात लस देऊ, प्रशासनाचं आश्वासन

आता आपल्याला लस मिळणार की नाही? या भीतीने त्यांनी करवले गावातल्या लसीकरण केंद्रावर जाऊन याबाबत तक्रार केली. मात्र तुम्ही दोन दिवसांनी परत या, तुम्हाला लस देऊ, असं त्यांना तोंडी सांगितलं गेलं. त्यामुळे नेमकं काय झालं? हे जाधव यांना समजायला मार्ग नव्हता. याबाबत लसीकरण केंद्र अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, सॉफ्टवेअरच्या अडचणींमुळे हा प्रकार घडला आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. विशेष म्हणजे अशाच प्रकारच्या 2 ते 3 घटना या भागात घडल्याचंही समोर आलं आहे. जो नोंदणी करतो, त्याच्या मोबाईलवर येणारा गोपनीय ओटीपी दिल्याशिवाय लसीकरण होत नाही. मात्र ओटीपी न देताच लसीकरणाचं सर्टिफिकेट कसं काय तयार होऊ शकतं? याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे (Man get vaccination certificate on app without vaccination shocking inncident in Ambernath).

हेही वाचा : दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार; राजेश टोपेंचं मोठं विधान

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI