5

मीरा रोड हत्याकांडाची मोठी अपडेट ! लिव्ह इन पार्टनरचे तुकडे का केले?, नराधमाचं धक्कादायक कारण; खूनाचा आरोपही नाकारला

मीरा रोड हत्याकांडाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय होता. पण त्याने आपण हत्या केलीच नसल्याचं म्हटलं आहे.

मीरा रोड हत्याकांडाची मोठी अपडेट ! लिव्ह इन पार्टनरचे तुकडे का केले?, नराधमाचं धक्कादायक कारण; खूनाचा आरोपही नाकारला
manoj saneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 2:22 PM

मीरा रोड : मीरा रोड येथील हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आरोपी मनोज सिन्हा याने पोलीस चौकशीत सनसनाटी खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाश्यामुळे पोलिसांच्या चौकशीचा अँगलच बदलून जाणार आहे. मनोज सिन्हाने लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या केल्याचा इन्कार केला आहे. मी सरस्वतीची हत्या केली नाही. सरस्वतीने 3 ते 4 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती, असा खुलासा त्याने केला आहे. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत.

सरस्वतीने 3-4 दिवसांपूर्वी विष घेऊन आत्महत्या केली, असं मनोजने सांगितलं. सरस्वतीने असं का केलं? असा सवाल पोलिसांनी त्याला केला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. सरस्वतीच्या चारित्र्यावर मला संशय होता. त्यामुळे आमच्या दोघात वाद होत होता. झगडे व्हायचे. ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशीही आमच्यात भांडणं झाली. त्यानंतर सरस्वतीने घरी येऊन विष घेऊन आत्महत्या केली, असं मनोजने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

घाबरून गेल्याने…

सरस्वतीने अशा पद्धतीने आत्महत्या केल्याने आपण घाबरून गेलो होतो. सरस्वतीच्या आत्महत्येला आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल, असं मला वाटलं. त्यामुळेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान तयार केला. झाड कापण्याच्या कटरने तिच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. त्यानंतर तिचे तुकडे कुकरमध्ये उकळून भाजले. त्याचा पाऊडर केला आणि सोसायटीच्या मागच्या नाल्यात फेकून दिले, अशी धक्कादायक माहिती त्याने दिली.

12 ते 13 तुकडे सापडले

या परिसरात मनोज हा सरस्वतीसोबत तीन वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत होता. त्याच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी मृतदेहाचे 12 ते 13 तुकडे मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी इतर तुकडे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरोपीच्या कबुलीत किती तथ्य आहे याची चौकशी करण्यासाठी पोलीस मृतदेहाचं पोस्टमार्टम करणार आहे. वैद्यकीय अहवालानंतरच या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.

कुत्र्यांना तुकडे दिले

दरम्यान, शेजाऱ्यांनी या घटनेवर धक्कादायक माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनोज भटक्या कुत्र्यांना काही तरी खायला देत होता, असं सोसायटीतील लोकांचं म्हणणं आहे. तसेच त्याने ड्रेनेजमध्येही मृतदेहाचे तुकडे फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्चीने पोलीस तपास करत आहेत.

बेडवर काळ्या रंगाच्या पिशव्या

पोलीस जेव्हा मनोजच्या घरात शिरले तेव्हा त्यांना प्रचंड दुर्गंधी आली. हॉलमध्ये त्यांना झाड कापण्यासाठीची कटर दिसली. त्यानंतर पोलिसांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिलं. तेव्हा बेडवर काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्याच पिशव्या दिसल्या. किचनचा दरवाजा उघडून पाहिलं तर तिथे तीन बादल्या दिसल्या. त्यात मृतदेहाचे तुकडे होते. चोहोबाजून रक्तच रक्त दिसत होतं. त्याशिवाय बेडरूममध्ये महिलेचे केस विखूरलेले होते. दुर्गंधी जावी म्हणून घरात मोठ्या प्रमाणावर एअर फ्रेशनर होते, हे दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले होते.

Non Stop LIVE Update
अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल
अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल
त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं
त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं
मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी
मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी
'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं
'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं
उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...
उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...
Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...