AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime: मुंबईत मध्यरात्री रिक्षाने जाताय? सावधान! लुटमार करणारी टोळी सक्रिय, दोघांना अटक

Mumbai Auto Rikshaw loot : रिक्षा बसलेल्या इतर दोघांनी या तरुणाची लुटमार केली.

Mumbai Crime: मुंबईत मध्यरात्री रिक्षाने जाताय? सावधान! लुटमार करणारी टोळी सक्रिय, दोघांना अटक
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 17, 2022 | 8:54 AM
Share

मुंबई : मुंबईत रात्रीच्या वेळेस किंवा शक्यतो वर्दळ नसलेल्या वेळी रिक्षाने (Mumbai Auto rikshaw) प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर सावधान! मुंबईत रिक्षा प्रवाशाला लुटण्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रवाशासोबत विक्रोळी एलबीएस रोडवर थरारक प्रकार घडला. पहाटे रिक्षा प्रवास करताना एका तरुण रिक्षा प्रवाशाची लुटमार (Mumbai Crime News) करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) दोघांना अटक केली आहे. तर रिक्षा चालक फरार आहे. 35 वर्षांचा एक तरुण पायी जात होता. तेव्हा रिक्षा चालकानं या तरुणाला विचारणा केली. इच्छीत स्थळी जाण्यास मदत होईल म्हणून तरुणही रिक्षात बसला. त्यावेळी रिक्षा बसलेल्या इतर दोघांनी या तरुणाची लुटमार केली. या तरुणाकडे असलेली रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन काढून घेत या तरुणाला खाली उतरवून लुटमार करणाऱ्यांनी पळ काढला. या घटनेमुळे रिक्षाचा प्रवास कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नेमकं तरुणासोबत काय घडलं?

35 वर्षांचा तरुण पाच जुलैला विक्रोळी येथून जात होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारात विक्रोळी स्थानकातून एलबीएस रोडने हा तरुणा पायी निघाला असता त्याला एका रिक्षावाल्यानं थांबवलं. सूर्यानगर जाणार का, अशी विचारणा केल्यानंतर हा तरुणंही हो म्हणत रिक्षात बसला.

दरम्यान, रिक्षामध्ये आधीच दोघेजण बसलेले होते. काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षातील इतर दोघांनी तरुणावर जबरदस्ती केली आणि त्याच्याकडे असलेली दहा हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली. नंतर सोन्याची रिंग आणि मोबाईल फोनही काढून घेतला. दरम्यान, नंतर या तरुणाला सूर्यानगरला न सोडता त्याला कांजूर येथील हुमा टॉकिस परिसरात सोडून आरोपी फरार झाले.

आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखलकरुन तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पावसामुळे रिक्षाचा नंबर नीट दिसत नव्हता. अखेर पोलिसांनी आपल्या सूत्रांना कामाला लावून रिक्षा आणि आरोपींचा शोध लावला. लुटमार करणारे आरोपी कल्याणच्या बनेली येथील राहणारे असल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर पोलिसांनी एकाला डोंबिवलीतून अटक केली. तर त्याच्या साथीदाराला बनेलीतून ताब्यात घेतलं. आता फरार रिक्षा चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जातेय. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी याआधीही लोकल आणि रिक्षात प्रवाशांची लुटमार केल्याचंही समोर आलंय.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.