व्हेल माशाच्या उलटीचा म्हणजेच कोट्यवधींच्या ‘वोमिट गोल्ड’चा काळाबाजार करणारे दोन जण ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई

वोमिट गोल्ड म्हणजे व्हेल माशाच्या उलटीतून बाहेर पडलेला पदार्थ ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपये आहे (Mumbai Crime Branch 3 busted whale vomit gold racket).

व्हेल माशाच्या उलटीचा म्हणजेच कोट्यवधींच्या 'वोमिट गोल्ड'चा काळाबाजार करणारे दोन जण ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई
व्हेल माशाच्या उलटीचा म्हणजेच कोट्यवधींच्या 'वोमिट गोल्ड'चा काळाबाजार करणारे दोन जण ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 3:09 PM

मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचने एकाच महिन्यात अशा दोन कारवाया केल्या आहेत ज्यामध्ये व्हेल मासाच्या उलट्याची अनधिकृतरित्या तस्करी केली जात होती. सदर प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने 7 कोटी 75 लाख (7.75 कोटी) रुपयांचं अ‍ॅम्बर्ग्रिस (वोमिट गोल्ड) मिळालं आहे. वोमिट गोल्ड म्हणजे व्हेल माशाच्या उलटीतून बाहेर पडलेला पदार्थ ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने याप्रकरणी दोघांना अटक केली (Mumbai Crime Branch 3 busted whale vomit gold racket).

धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी मुंबई पोलिसात हवालदार होता. त्याच्या अशाच अवैध कामकाजामुळे त्याला 2016 साली पोलीस खात्यातून काढून टाकण्यात आले होते. प्रसाद हिराचंद पिंगळे असे अटक करण्यात आलेल्या माजी कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्याचे वय 44 वर्षे आहे. तर दुसर्‍या आरोपीचे नाव अमित पाटील आहे, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे (Mumbai Crime Branch 3 busted whale vomit gold racket).

आताची कारवाई

गुन्हे शाखेचे युनिट 3 चे प्रभारी सोपान काकड यांनी या कारवाईबाबत ‘टीव्ह 9 मराठी’सोबत बोलताना माहिती दिली. “आम्हाला काहीजण मुंबईत अ‍ॅम्बर्ग्रिस पोहोचविण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्या झडतीदरम्यान आम्हाला साडेसात किलो अ‍ॅम्बर्ग्रिस मिळालं. त्यांच्याकडून आम्ही ते आता जप्त केलं आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील या अ‍ॅम्बर्गिसची किंमत तब्बल 7 कोटी 75 लाख रुपये आहे”, अशी माहिती सोपान काकड यांनी दिली.

गेल्या आठवड्यातील कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने काही दिवसांपूर्वीच व्हेलच्या दुर्मिळ प्रजातीच्या उलट्या म्हणजे अ‍ॅम्बर्ग्रिसची ब्लॅक-मार्केटिंग करणार्‍या तीन जणांना अटक केली होती. गुन्हे शाखेचे डीसीपी प्रकाश जाधव यांनी याबाबत माहिती दिली. “काही लोकांनी व्हेलची उलटी, ज्याला वोमिट गोल्ड या नावाने ओळखले जाते, त्याला विक्रीसाठी मुंबई येथे आणले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही आमच्यासोबत सागरी जीवशास्त्रज्ञ घेऊन मुलुंड भागात छापा टाकला. छापेमारी दरम्यान तिथे आम्हाला तीन लोक आढळले ज्यांच्या दोन किलो आणि सातशे ग्रॅम वजनाच्या बॅगमध्ये ब्राऊन रंगाचा पदार्थ दिसला. यानंतर आम्ही त्या पदार्थाची तपासणी सागरी जीवशास्त्रज्ञाच्या मदतीने केली. तेव्हा कळले की तो पदार्थ वोमिट गोल्ड आहे”, असं डीसीपी प्रकाश जाधव यांनी सांगितलं.

जाधव म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारात वोमिट गोल्ड सोनं खूप महाग विकलं जातं. त्याची किंमत प्रतिकिलो एक कोटी रुपये आहे. आम्ही 2.7 किलो वोमिट गोल्ड म्हणजेच अॅमब्रिगिस पकडले आहेत, ज्याचे एकूण मूल्य 20 कोटी 70 लाख रुपये आहे.”

रमेश वागेला, अरविंद शहा आणि धनाजी ठाकूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी एक आरोपी गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी असून दोन आरोपी मुलुंड येथील रहिवासी आहेत.

“वोमिट गोल्ड दुर्मिळ प्रजातीच्या व्हेल माशापासून उलटीद्वारे शरीरातून बाहेर पडते. ते इतके हलके आहे की ते समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. हे वन्यजीव अधिनियमान्वये संरक्षित केले गेले आहे. कोणी जर त्याचा अवैधपणे व्यापार करताना आढळल्यास त्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाते”, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली.

आरोपी वोमिट गोल्ड कसे मिळवतात?

हे वोमिट गोल्ड गुजरातहून मुंबईला आणण्यात आले होते. बरेच लोक अशा वोमिट गोल्डच्या शोधासाठी समुद्रात खोलवर जातात. कधीकधी असेही घडते की एक मच्छीमार मासे पकडण्यासाठी जाळे टाकतो आणि त्याच्या जाळ्यामध्ये वोमिट गोल्ड येतं. पण ज्ञानाचा अभाव असल्यामुळे लोक ते परत पाण्यात फेकतात. याची जाणीव असलेले बरेच लोक समुद्रावर गस्त घालतात आणि ते शोधतात आणि ते वोमिट गोल्डची ब्लॅक मार्केटिंगही करतात.

वोमिट गोल्ड कशासाठी उपयुक्त आहे?

वोमिट गोल्ड हे व्हेल माशीची उलटी असते, असं म्हणातात. पण त्याचा गंध फार चांगला असतो. लाखो रुपयांना विकल्या जाणाऱ्या परफ्यूममध्ये ते वापरलं जातं. महागड्या दारू बनविण्यामध्ये, औषधे बनविण्यासारख्या इतरही ठिकाणी याचा वापर केला जातो. तसेच महाग सिगारेट बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये या दुर्मिळ वोमिट गोल्डची मागणी खूप जास्त आहे.

पुढील तपास सुरु

कोर्टाने दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा पुढील तपास सुरु आहे. आरोपींनी हे वोमिट गोल्ड नेमकं कोणाकडून आणलं आणि ते कोणाला देणार होते आणि या संपूर्ण रॅकेटचे तार कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा शोध गुन्हे शाखेचे अधिकारी घेत आहेत.

हेही वाचा : औरंगाबाद जेलमध्ये कट रचला, भावाने बहिणीचं कुंकू पुसलं, करण परोपटे हत्याकांडात मोठा खुलासा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.