गर्ल्स हॉस्टेलच्या बंद खोलीत तरुणीचा मृतदेह, अंगावर फक्त… आरोपीची बॉडीही रेल्वे ट्रॅकवर आढळली; नेमकं काय घडलं?

मुंबईतील सर्वात पॉश समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीचा मृतदेह आढळला आहे. तर आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गर्ल्स हॉस्टेलच्या बंद खोलीत तरुणीचा मृतदेह, अंगावर फक्त... आरोपीची बॉडीही रेल्वे ट्रॅकवर आढळली; नेमकं काय घडलं?
savitribai phule hostel Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 6:40 AM

मुंबई : मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही तरुणी 19 ते 20 वर्षाची असून ती विद्यार्थीनी आहे. मरीन ड्राईव्ह येथील एका हॉस्टेलमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. हॉस्टेलचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. या तरुणीच्या गळ्याभोवती दुपट्यासारखा एक कपडा गुंडाळलेला आढळला. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवाल आहे. या आत्महत्येचा तपास सुरू असतानाच पोलिसांना आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. त्यामुळे या दोन्ही मृत्यूमागचं गूढ वाढलं आहे.

या विद्यार्थीनीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये काम करणारा एक तरुण फरार झाला आहे. हा तरुण वसतिगृहाच्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होता. तो घटनास्थळी नसल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही अंतरावर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला आहे.

हे सुद्धा वाचा

अंगावर काहीच नव्हतं

या तरुणाचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे स्टेशनच्या रेल्वे रुळावर मिळाला आहे. या तरुणाची ओळख पटली आहे. प्रकाश कनोजिया असं त्याचं नाव आहे, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या घटनेतील एक धक्कादायक माहिती दिली आहे. या मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. त्यावेळी तिच्या अंगावर फक्त अंडरगारमेंट्स होतील. तसेच गळ्याभोवती दुपट्टासारखा कपडा होता. त्या व्यतिरिक्त अंगावर काहीच नव्हतं. तिच्या अंगावर जखमा दिसून आल्या. तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. या तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर अधिक माहिती मिळणार होती, असं पोलिसांनी सांगितलं.

आरोपी विवाहित, पत्नी गावाला

प्रकाश कनोजिया हा विवाहित होता. वडिलांसोबत तो त्याच वसतिगृहात काम करत होता. त्याची पत्नी गावाला राहते. तो यूपीच्या प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. ही तरुणी चौथ्या मजल्यावर राहत होती. तिचा मृतदेह आत होता आणि खोली बाहेरून बंद होती. पोलिसांना तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला आहे, त्यावरून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट होतंय, असं पोलिसांनी सांगितलं.

अकोल्यातून शिकायला आली

ही तरुणी अकोल्यातील राहणारी होती. ती मुंबईतील सर्वात पॉश आणि सुरक्षित अशा सावित्रीबाई फुले वसतिगृहात शिकत होती. विद्यार्थीनीची हत्या केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने या तरुणाने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.