VIDEO | मोबाईलवर बोलणाऱ्या बाईकस्वाराचा ‘बेस्ट’ला धक्का, बस चालकालाच तरुणाची मारहाण

दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत बाईक चालवत होता. त्यावेळी त्याचा धक्का बसला लागला. त्यानंतर त्याने चालकालाच केबिनमधून खेचून बाहेर काढले आणि भररस्त्यात मारहाणही केली.

VIDEO | मोबाईलवर बोलणाऱ्या बाईकस्वाराचा 'बेस्ट'ला धक्का, बस चालकालाच तरुणाची मारहाण
कांदिवलीत बाईकस्वाराची बस चालकाला मारहाण


मुंबई : बाईकस्वाराने बेस्ट बस चालकाला केबिनमधून बाहेर खेचून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईलवर बोलत बाईक चालवणाऱ्या तरुणाचा बेस्ट बसला धक्का लागला, त्यानंतर चूक नसतानाही बस ड्रायव्हरला दुचाकीस्वाराने मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मुंबईतील कांदिवली भागात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी बाईकस्वाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai Kandivali BEST Bus Driver Beaten up by Bike rider talking on mobile)

नेमकं काय घडलं?

कांदिवली पूर्व भागात बिग बाजारच्या जवळ ही घटना घडली. संबंधित दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत बाईक चालवत होता. त्यावेळी त्याचा धक्का बसला लागला. बस चालकाची चूक नसतानाही तरुणाने त्याला केबिनमधून खेचून बाहेर काढले. त्यानंतर भररस्त्यात चालकाला मारहाणही केली.

आरोपी बाईकस्वाराला अटक

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून कंडक्टरसह इतर व्यक्तीही मध्यस्थी करताना दिसत आहेत. तरीही बाईकस्वार बेस्ट बस चालकाला बेदम चोप देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी या बाबत गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्या आरोपी बाईकस्वार तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. समता नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | रेशन कार्डवरुन वाद, नायब तहसीलदारांना महिलेची कार्यालयातच मारहाण

तरुणीसह दोघा मित्रांना मारहाण, कल्याणमध्ये रिक्षा चालकासह 11 जणांना अटक

(Mumbai Kandivali BEST Bus Driver Beaten up by Bike rider talking on mobile)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI