कल्याण : कल्याणमध्ये एका युवतीसह दोघा तरुणांना मारहाण केल्या प्रकरणी रिक्षा चालकासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलीस 11 आरोपींना कल्याण कोर्टात हजर करणार आहे. रिक्षाचालकाने छेड काढल्यानंतर तरुणीने मदतीसाठी दोघा मित्रांना बोलावले, मात्र जमावाने या तिघांनाच बेदम मारहाण केली होती. शुक्रवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Kalyan Girl and two friends beaten up by mob after fight with rickshaw driver 11 arrested)