कांजुर मार्गमध्ये ब्रिजवर मोठा अपघात, चार गाड्या एकामागोमाग धडकल्या

जेव्हीएलआर ब्रिजवर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कांजुर मार्गमध्ये ब्रिजवर मोठा अपघात, चार गाड्या एकामागोमाग धडकल्या
मुंबईत कांजुरमार्ग ब्रिजवर अपघात

मुंबई : मुंबईतील कांजुर मार्ग भागात ब्रिजवर मोठा अपघात झाला. चार गाड्या एका मागोमाग धडकल्या. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

कांजुर मार्ग ब्रिजवर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चार गाड्या एका मागून एक धडकल्या होत्या. यातील दोन बस एका मागोमाग धडकल्याने दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झालं.

पाच ते सहा जण किरकोळ जखमी

जेव्हीएलआर ब्रिजवर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप

विक्रोळी ब्रिजपासून ईस्टर्न एक्स्प्रेस-वे जाम झाला होता. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

पुण्यातील नवले पुलावर अपघात

बंगळुरु-मुंबई हायवेवर पुण्यात नऱ्हे भागातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात नवले पुलावर आठ दिवसांत चौथा अपघात, ट्रक 25 फूट घसरला

मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर ट्रेलर दुभाजक ओलांडून विजेच्या खांबाला धडकला, अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाकडून जीवनदान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI