पुण्यात नवले पुलावर आठ दिवसांत चौथा अपघात, ट्रक 25 फूट घसरला

बंगळुरु-मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.

पुण्यात नवले पुलावर आठ दिवसांत चौथा अपघात, ट्रक 25 फूट घसरला
Navale Bridge Accident
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 8:00 AM

पुणे : बंगळुरु-मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील नवले पूल परिसरात आठ दिवसांत चौथा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. पंचवीस फूट महामार्गावर ट्रक खाली आला.

बंगळुरु-मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.

साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. दरम्यान, ट्रक महामार्गावरुन खाली सेवा रस्त्यावर आला. पुढे सेवा रस्त्यालगत असणाऱ्या रॉयल रेस्टो बारच्या पायऱ्यांना धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.

नवले पूल बनला ‘डेथ झोन’

मुंबई बंगळुरु बाह्य वळण महामार्गावरील पुण्यात वाहतुकीसाठी धोकदायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या महामार्ग भोवती अफाट नागरिकीकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. 2014 पासून या ठिकाणी झालेल्या अपघातात 56 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

शुक्रवारी (22 ऑक्टोबर) नऱ्हे गावच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेम्पो ट्राव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 12 जण जखमी झाले. यानंतर पुन्हा एकदा या रस्ता चर्चेत आलाय.

याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागिरक करताहेत. प्रशासन फक्त काम करत असल्याचे भासवत आहे. तसेच, स्थानिक लोक प्रतिनिधी फक्त पाहाणी करुन आदेश देण्यात धन्यता मानताना दिसत आहे. परंतु त्यावरील ठोस उपयोजना झाली आहे की नाही याकडे मात्र सर्रासपणे डोळे झाक करत असल्याचं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

वर्षांत झालेले अपघात (2020-2021)

♦ नेहमी अपघात होणारे अंतर चार किलोमीटर (कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल ) ♦ छोटे-मोठे 42 अपघात ♦ 22 मृत्यू ♦ 7 ब्लॅक स्पॉट ♦ 40 हून अधिक जखमी ♦ 60 हुन अधिक वाहनांचे नुकसान ♦ मोठे अपघात 16, मृत्यू 18 ♦ 2014 पासून एकूण मृत्यू 56

कात्रज नवीन बोगद्यपासून नवले पुलापर्यंत अतिशय तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग वाढतो. वेग वाढल्यानंतर अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे नवले पुलाचा उतार आणि वडगाव पुलावर जाताना असणारा चढ तसेच विश्वास हॉटेल समोर असणारे पंचर अतिशय धोकादायक ठरत आहेत. अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे दिसून आले आहेत. तसेच, चालकांनी देखील वाहने जबाबदारीने चालवावीत, महामार्गाच्या नियमांचे पालन करावे, असं महामार्ग प्रशासन आणि पोलिसांच म्हणणं आहे.

याठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला बेफाम वेगात वाहनं चालवणाऱ्या चालकांसह महामार्ग प्रशासन ही तितकेच जबाबदार आहे. अपघाताच खापर वाहनचालकांच्या चुकांवर फोडण्याआधी प्रशासनाने आपल्या चुका दुरुस्त करण्याची अधिक आवश्यकता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघातांचा प्रश्न गडकरींच्या दरबारी, मोहोळ थेट दिल्लीत भेटीला

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.