AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : मुलाला नोकरी लावण्याच्या नावाखाली सेवानिवृत्त जोडप्याला गंडा, दोघांविरोधात गुन्हा दाखल

मुलाला नोकरी लावून देतो सांगत दोन जणांनी एका सेवानिवृत्त जोडप्याला लाखांचा गंडा घातला. पाच वर्षे आरोपी आश्वासन देत जोडप्याची फसवणूक करत होते.

Mumbai Crime : मुलाला नोकरी लावण्याच्या नावाखाली सेवानिवृत्त जोडप्याला गंडा, दोघांविरोधात गुन्हा दाखल
पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला गंडा
| Updated on: Jul 26, 2023 | 11:28 AM
Share

मुंबई / 26 जुलै 2023 : मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त जोडप्याला तब्बल 18 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेन्री पॉल आणि भावना टी अशी फसवणूक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी पैसे घेऊन गेली पाच वर्षे फिर्यादींना केवळ आश्वासन देत होते. विलेपार्ले पोलिसांनी कलम 34 (गुन्ह्याचा सामान्य हेतू), 406 (विश्वासाचा भंग) आणि 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मित्राच्या माध्यमातून आरोपींशी ओळख

विलेपार्ले येथे राहणारे श्रीपत रेवगडे आणि त्यांची पत्नी टपाल सेवेतून निवृत्त झाले आहेत. रेवगडे यांचा मुलगा नितिनने 2015 मध्ये यूएसएच्या मायामी फ्लाइंग अकादमीमध्ये पायलटचा कोर्स पूर्ण केला होता. मात्र त्याला नोकरी नव्हती. नितिन नोकरीच्या शोधात असतानाच रेवगडे यांची एका मित्राच्या माध्यमातून हेन्री पॉल याच्यासोबत ओळख झाली. हेन्रीने आपण अपोलो गुप्तचर सुरक्षा कंपनी चालवत असून, विविध विमान कंपन्यांमध्ये संपर्क असल्याचे रेवगडे यांना सांगितले.

जेव्हा रेवगडे आणि त्यांचा मित्र हेन्रीला भेटले तेव्हा त्याने आपली जोडीदार भावना हिच्याशी ओळख करुन दिली. रेवगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेन्रीने आपली जेट एअरवेजमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्याशी ओळख असल्याचा दावा केला होता, जो टाइप रेटिंग कोर्स चालवण्यास मदत करू शकतो. तसेच अकादमीतून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अधिकारी त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी देईल, असेही त्याने सांगितले.

कोर्स आणि नोकरीसाठी 18 लाख रुपये भरले

हेन्री याच्या बोलण्याला फसून रेवगडे यांनी अंधेरी पूर्व येथील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि आपल्या मुलासाठी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली. हेन्रीने त्यांना कोर्सची फी 18 लाख रुपये असल्याचे सांगितले. यामध्ये नोकरीची ऑफर देखील समाविष्ट होती. याव्यतिरिक्त, भावनाच्या सेवांसाठी अतिरिक्त 3 लाख शुल्क होते.

हेन्रीने अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी 18 लाख रुपयांचे संपूर्ण पेमेंट करण्यास सांगितले. उर्वरित 3 लाख रुपये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर भरायचे होते. सर्व देयके हप्त्यांमध्ये आणि चेकद्वारे प्राप्त करण्याचा त्यांनी आग्रह धरला. हेन्री आणि भावना यांनी विनंती केल्यानुसार रेवगडे यांनी अनेक हप्त्यांमध्ये 18 लाख रुपये दिले. अंतिम पेमेंट मार्च 2018 मध्ये करण्यात आले.

2018 पासून केवळ आश्वासन देत राहिला

पैसे घेतल्यानंतर रेवगडे कोर्स आणि नोकरीबाबत विचारणा केली असता हहेन्री केवळ त्यांना आश्वासन देत राहिला. तथापि, 2019 मध्ये, जेट एअरवेज कंपनी बंद झाली होती. त्यानंतर रावगडे यांनी कोर्स आणि नोकरीबद्दल विचारण्यासाठी हेन्रीकडे पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी हेन्रीने त्यांना दुसऱ्या कंपनीत कोर्स आणि नोकरीची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. रेवगडे यांनी वारंवार कोर्स आणि नोकरीबद्दल विचारले पण हेन्रीने टाळाटाळ केली.

यानंतर 2019 मध्ये, हेन्रीचे कार्यालय बंद झाले आणि तो गायब झाला. यानंतर रेवगडे यांनी हेन्री आणि भावना यांना मोबाईलवर संपर्क साधत कोर्स आणि नोकरीबाबत असता त्यांनी पुन्हा टाळाटाळ केली. अखेर 2023 मध्ये, रेवगडे यांच्या हेन्री आणि भावना फ्रॉड असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवत पुढील तपास सुरु केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.