AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : विमानात नको ते करणे महागात पडले, सहारा पोलिसांकडून प्रवाशाला अटक

विमान प्रवास करत असताना काही नियमावली पाळावी लागते. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.

Mumbai Crime : विमानात नको ते करणे महागात पडले, सहारा पोलिसांकडून प्रवाशाला अटक
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Aug 05, 2023 | 6:15 PM
Share

मुंबई / 5 ऑगस्ट 2023 : सौदी अरेबियाहून मुंबईला येत असताना विमानात नको ते कृत्य करणं एका प्रवाशाला महागात पडलं आहे. विमान प्रवासादरम्यान सिगारेट ओढल्याप्रकरणी एका 26 वर्षीय तरुणाला सहारा पोलिसांनी अटक केली आहे. कवराज तगत सिंग असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. आयपीसी कायद्याच्या कलम 336 (इतरांचे जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) आणि विमानाच्या 25 (विमानाच्या कोणत्याही भागात किंवा त्याच्या परिसरात, ज्यामध्ये धुम्रपान निषिद्ध असल्याचे सूचित करणारी नोटीस प्रदर्शित केली जाते) अंतर्गत सिंगवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुबईहून मुंबईला येत होता प्रवासी

इंडिगो एअरलाईन्सचे विमान 3 ऑगस्ट रोजी दुबईहून मुंबईला येत होते. याच विमानातून कवराज सिंग हा प्रवास करत होता. यावेळी प्रवासादरम्यान सिंग हा टॉयलेटमध्ये गेला आणि सिगारेट ओढू लागला. टॉयलेटमधून अचानक धूर आणि दुर्गंधी येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी टॉयलेटमध्ये जाऊन पाहिले असता आत लायटर आणि सिगारेटचा तुकडा दिसला. कर्मचाऱ्यांनी सिंगला याबाबत विचारणा केली.

सहारा पोलिसांकडून प्रवाशाला अटक

विमान मुंबई विमानतळावर येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ करवाज सिंग याला सहारा पोलिसांच्या ताब्यात दिले. विमानात धुम्रपान करण्यास मनाई करण्याबाबत उड्डाण कर्मचार्‍यांकडून स्पष्ट सूचना असूनही सिंग याने विमानाच्या शौचालयात धुम्रपान केले. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. सिंग याच्या या कृत्यामुळे अन्य प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Follow Us
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह