मुलींनो, इन्स्टावर फोटो टाकत असाल, तर हे वाचाच! फोटोवर पॉर्नचा आवाज लावून मुलींना लुटलं, विकृत तरुणाला गुजरातमधून अटक

प्रशांत आदित्य हा दहावी नापास असल्याची माहितीही पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.

मुलींनो, इन्स्टावर फोटो टाकत असाल, तर हे वाचाच! फोटोवर पॉर्नचा आवाज लावून मुलींना लुटलं, विकृत तरुणाला गुजरातमधून अटक
धक्कादायक घटना...
सुरज मसुरकर

| Edited By: सिद्धेश सावंत

Jul 28, 2022 | 12:03 PM

मुंबई : एका खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलींनो, तुम्ही जर इन्स्टाग्रामचा (Instagram News) वापर करत असाल आणि त्यावर तुम्ही सर्रास स्वतःचे फोटो अपलोड (Upload Photo) करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. इन्स्टाग्रामवरुन मुलींचे फोटो डाऊनलोड करुन त्या फोटोंसोबत छेडछाड केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. टीव्ही 9 नेटवर्कचे गुजरात प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, याप्रकरणी गुजरातमधून (Gujrat Crime News) तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुलींचे फोटो इन्स्टावरुन डाऊनलोड करायचे, त्यामागे पॉर्नफिल्मचा अश्लिल आवाज एडीट करुन लावायचा, असा भयंकर आणि विकृत प्रकार एका तरुणानं चालवला होता. गुजरातच्या गांधीनगरमधून हे कृत्य केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. मुलींचे हे एडीट केलेले व्हिडीओ हा तरुण त्यांना पाठवायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्यांना धमकी द्यायचा. या सगळ्या प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचं वय अवघ 19 वर्ष आहे. टीनएजर असलेल्या तरुणाने या घृणास्पद केलेल्या कृत्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मुंबई पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणाची माहिती दिली आहे.

गुजरातमध्ये कांड, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलीस डीसीपी संजय पाली यांनी याची माहिती दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव प्रशांत आदित्य असून हा मुलगा गुजरातच्या गांधीनगरमधून हे कांड करत होता. गांधीनगरमध्ये बसून हा इन्स्टाग्रामवरुन मुलींचे फोटो डाऊनलोड करायचा. तिथून त्यांच्या फोटोवर पॉर्न फिल्मचा आवाज एडीट करुन लावायचा आणि तरुणींना धमकावून 500 आणि 1000 रुपये उकळायचा, असा प्रकार समोर आला आहे. अवघ्या पाचशे आणि हजार रुपयांसाठी या प्रशांत आदित्य नावाच्या मुलाने कित्येक तरुणींना गंडा घातलाय. मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आता प्रशांत आदित्य या 19 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.

आरोपी दहावी नापास

प्रशांत आदित्य हा दहावी नापास असल्याची माहितीही पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे. दहावी नापास या तरुणाने सोशल मीडियाचा केलेला विकृत वापर हा हादरवून टाकणारा आहे. प्रशांससारखे असे कितीतरी विकृत मानसिकतेचे लोकही आजूबाजूला असण्याची भीती आता यानिमित्तानं व्यक्त केली जाते आहे. प्रशांतने केलेल्या कृत्यामुळे आता तरुणींना सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अशाप्रकारे आपली फसवणूक होऊ नये, यासाठी तरुणींनीही सजग राहावं. तसंच इन्स्टाग्रामच नव्हे तर फेसबूकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर हा सतर्क राहून करावा, असं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय.

हे सुद्धा वाचा

किती जणींना गंडा

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 21 तरुणींना प्रशांने गंडा घातल्याचं समोर आलं आहे. तर 50 पेक्षाही जास्त तरुणींना या टीन एजरने गंडा घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. फक्त एका राज्यापुरतं नव्हे तर देशभरातील तरुणींना प्रशांतने आपला निशाणा बनवलं होतं. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तरुणींनाही आवाहन केलं आहे. तुमच्याही बाबतीत अशाप्रकारचा किस्सा घडला असेल, तर हिंमत करुन पुढे यावं आणि पोलिसांना तक्रार द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें