AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला सहा महिन्यांचा ब्रेक, कारण…

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी झाल्यानतंर आता आठ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात काढणाऱ्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती.

मुंबईतील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला सहा महिन्यांचा ब्रेक, कारण...
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 11:19 AM
Share

मुंबई : आठ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेक लागला आहे. कोव्हिड प्रादुर्भाव, पालिका निवडणुका आणि सण समारंभ यांच्या पार्श्वभूमीवर बदलींचे आदेश सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत. बदलींसाठी मुंबईतील 727 अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. (Mumbai Police officers who completed 8 years transfer orders to stay for 6 months)

काय आहे कारण?

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी झाल्यानतंर आता आठ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात काढणाऱ्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती. मात्र शहरातील पोलिस दलात असलेली रिक्त पदे, कोव्हिड19 चा प्रादुर्भाव, सण, महापालिका निवडणुका, गणपती, नवरात्र या पार्श्वभूमीवर काल झालेल्या पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत या आदेशावर सहा महिन्यानंतर कारवाई करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.

कोणाची होणार होती बदली?

शहरामध्ये आठ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांची मुंबईबाहेर बदली होणार होती. त्यात नवी मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरांचा समावेश होता. मुंबई पोलिसातील संबंधित 727 अधिकाऱ्यांना मुंबई शहराबाहेरील आपल्या पसंतीच्या तीन जागा निवडण्याचे आदेश देण्यात आले होते.

पोलीस दलातून तातडीची पावलं का?

पोलीस विभागातील भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली करण्याचे कथित आदेश दिल्याच्या प्रकरणात सचिन वाझेसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचार आणि तत्सम गंभीर आरोप लक्षात घेत पोलीस विभागाने मोठा निर्णय घेतला

संबंधित बातम्या :

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर बेड्या

आठ वर्ष मुंबईतच पोस्टिंग, बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार, 727 जणांची यादीही तयार

(Mumbai Police officers who completed 8 years transfer orders to stay for 6 months)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.