‘सोशल मीडियात बोलू नका, कोर्टात जा’, एनसीबीने प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळले

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांवर आता एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

'सोशल मीडियात बोलू नका, कोर्टात जा', एनसीबीने प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळले
एनसीबी अधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 7:08 PM

मुंबई : क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच त्यांचा या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप केला होता. आता त्यांच्या याच आरोपांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे एनसीबी या आरोपांप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होती. त्यासाठी पत्रकार परिषदेची दिवसभरात तीन वेळा वेळ ठरवण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. आता एनसीबीने प्रसिद्ध पत्रक जारी करत भूमिका मांडली आहे. यामध्ये एनसीबीने साईल यांना कोर्टात आपलं म्हणणं मांडण्याचा सल्ला दिला आहे.

एनसीबीच्या प्रसिद्धीपत्रात नेमकं काय म्हटलंय?

एनसीबीचे अधिकारी मुठा अशोक जैन यांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एनसीबीची भूमिका मांडली आहे. “आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणावर सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. तसेच या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईल यांना काही मत मांडायचं होतं तर त्यांनी सोशल मीडिया ऐवजी न्यायालयात मांडायला हवं होतं. त्यांनी सोशल मीडियावर काही लोकांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडण केलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आणि तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरांकडे पाठवत असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल”, असं एनीसीबीच्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.

प्रभाकर साईलचे नेमके आरोप काय?

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....