AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फटाक्याच्या आवाजात डाव साधला, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचं यूपी आणि हरियाणाशी कनेक्शन; तिसरा आरोपी अजूनही फरार

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

फटाक्याच्या आवाजात डाव साधला, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचं यूपी आणि हरियाणाशी कनेक्शन; तिसरा आरोपी अजूनही फरार
Baba SiddiqueImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2024 | 12:55 AM
Share

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यांच्या छातीवर गोळी लागल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांपैकी एकजण यूपी आणि दुसरा हरियाणाचा असल्याचं सांगितलं जात आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच फरार आरोपीचा तपास सुरू केला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास हल्ला झाला. बाबा सिद्धीकी या सुमारास त्यांच्या वांद्रे येथील निर्मल नगरच्या कार्यालयातून निघाले होते. ते ऑफिसच्या बाहेर फटाके फोडत होते. फटाक्यांचा मोठमोठा आवाज येत होता. त्यावेळी अचानक गाडीतून तीन लोक उतरले. तिघांच्याही चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. या तिघांनी फटाक्यांचा आवाज सुरू असतानाच अचानक बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीवर लागली. त्यामुळे गोळी लागताच बाबा सिद्दीकी कोसळले. त्यांना लगेचच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दोघे ताब्यात

या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. एक यूपीतील आहे तर दुसरा हरियाणाचा राहणारा आहे. तर एक संशयित आरोपी फरार आहे.

बंदूक ताब्यात

बाबा सिद्दीकी यांच्यावर 9.9 एमएमची गोळी झाडण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात आहे. या गोळीबारासाठी वापरण्यात आलेली बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या शेल्स जमा करण्यासाठी बॅलेस्टिक डिव्हिजनची टीम दाखल झाली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक हे चौकशी करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

फडणवीस तासभर रुग्णालयात

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तात्काळ लिलावती रुग्णालयात पोहोचले. तब्बल तासभर फडणवीस रुग्णालयात होते. यावेळी त्यांनी पोलीस आणि डॉक्टरांशी चर्चा करून सर्व माहिती घेतली. या प्रकरणात आम्ही आरोपींवर कठोर कारवाई करणार आहोत. कुणालाही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.